शाहनवाज हुसैन दिल्लीतून थेट पाटण्यात, उद्या मंत्रीपदाची शपथ घेणार? काय आहे भाजपची खेळी?

नितीश सरकारच्या सध्याच्या मंत्रिमंडळात फक्त 14 मंत्रीच आहेत. तर 24 मंत्रिपदाच्या जागा अद्याप रिक्त आहेत. | Shahnawaz Hussain

शाहनवाज हुसैन दिल्लीतून थेट पाटण्यात, उद्या मंत्रीपदाची शपथ घेणार? काय आहे भाजपची खेळी?
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 8:44 PM

पाटणा: बिहारमध्ये मंगळवारी नितीश कुमार सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी भाजपमध्ये बऱ्याच काळापासून मागच्या बाकावर बसून असलेल्या शाहनवाज हुसैन (Shahnawaz Hussain) यांना अनपेक्षित संधी मिळण्याची शक्यता आहे. शाहनवाज हुसैन आणि मुख्तार अब्बास नक्वी हे भाजपमधील दोन प्रमुख मुस्लीम चेहरे मानले जातात. दोघेही जण भाजपच्या संस्कृतीशी एव्हाना समरस झाले आहेत. (What Shahnawaz Hussain shift to Bihar says about Muslim leaders options in BJP)

यापैकी मुख्तार अब्बास नक्वी यांना मोदींच्या कार्यकाळात चांगल्या संधी मिळाल्या. सध्या ते केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाची धुरा सांभाळत आहेत. या तुलनेत शाहनवाज हुसैन यांच्याकडे मोदींच्या काळात दुर्लक्ष झाले होते. मात्र, त्याच शाहनवाज हुसैन यांचे आता बिहारमध्ये पुनवर्सन करण्यात येणार आहे.

नितीश सरकारच्या सध्याच्या मंत्रिमंडळात फक्त 14 मंत्रीच आहेत. तर 24 मंत्रिपदाच्या जागा अद्याप रिक्त आहेत. त्यामुळे आता या जागांवर भाजपकडून शाहनवाज हुसैन, सम्राट चौधरी, नितीन नवीन आणि संजीव चौरासिया यांनी संधी मिळण्याची शक्यता आहे. तर जदयूकडून जामा खान, संजय झा आणि सुमीत सिंह यांच्या नावाची चर्चा आहे.

काय आहे भाजपची खेळी?

अनेक वर्षांपासून दिल्लीत रुळलेल्या शाहनवाज हुसैन यांना बिहारमध्ये पाठवण्याचा निर्णय अनपेक्षित मानला जात आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानपरिषदेच्या निवडणुकीत शाहनवाज हुसैन यांची बिनविरोध निवड झाली होती. मात्र, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हुसैन यांनाही आपल्याला बिहारमध्ये जावे लागेल, याची कल्पना नव्हती. आता यामागे भाजपने नक्की काय गणिते आखली आहेत, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

‘विधानपरिषदेचा आमदार होण्याचा विचारही केला नव्हता’

मी कधी विधानपरिषदेचा आमदार होण्याची विचारही केला नव्हता, असे शाहनवाज हुसैन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मला याबाबत काहीच माहिती नव्हती. पण एक दिवस अचानक पक्षश्रेष्ठींचा फोन आला आणि त्यांनी मला विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आदेश दिला. हा आदेश शिरसावंद्य मानत मी अर्ज भरला, असे शाहनवाज हुसैन यांनी सांगितले.

(What Shahnawaz Hussain shift to Bihar says about Muslim leaders options in BJP)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.