Vice President : उपराष्ट्रपती पदासाठी यूपीएतर्फे मार्गारेट अल्वांना उमेदवारी, शरद पवारांनी केली घोषणा

उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांतर्फे मार्गारेट आल्वा यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

Vice President : उपराष्ट्रपती पदासाठी यूपीएतर्फे मार्गारेट अल्वांना उमेदवारी, शरद पवारांनी केली घोषणा
यूपीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वाImage Credit source: prashnpatr
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 5:15 PM

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांतर्फे मार्गारेट आल्वा (Margaret Alva) यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती पदासाठी आम्ही एक उमेदवार घोषित करण्याचे ठरवले आहे. मार्गारेट अल्वा उपराष्ट्रपती पदाच्या (Vice President) उमेदवार असतील. त्या मंत्री, खासदार आणि राज्यपाल होत्या. आम्ही चर्चा केली आणि एकमताने मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. काँग्रेस, डीएमके, सपा, एनसीपी, आरजेडी, शिवसेना, टीआरएस, आरएसपी, मनी काँग्रेस, एमडीएमके, सीपीआय, सीपीआयएम, जेएनएल, नॅशनल काँग्रेसने यास पाठिंबा दिला आहे. ममता बॅनर्जींना संपर्क साधला. पण त्या परिषदेत व्यस्त होत्या. त्यांच्याशी संपर्क झाला नाही. आम्ही केजरीवाल यांनाही संपर्क साधला. ते उद्या त्यांच्या पाठिंब्याबाबत दोन दिवसात सांगणार आहेत, असेही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

मार्गारेट अल्वा यांच्याविषयी…

मार्गारेट अल्वा या राजस्थानच्या राज्यपाल राहिलेल्या आहेत. त्या मूळ कर्नाटकातील आहेत. 199 मध्ये लोकसभेवर निवडून येण्यापूर्वी मार्गारेट अल्वा 1974पासून सलग सहा वर्षे राज्यसभेवर निवडून आल्या होत्या. 1984च्या राजीव गांधी सरकारमध्ये अल्वा यांना केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री करण्यात आले. नंतर, मनुष्यबळ विकास मंत्रालयात, युवा कार्य आणि क्रीडा, महिला आणि बाल विकास प्रभारी मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली. 1991मध्ये त्यांना केंद्रीय कार्मिक, निवृत्ती वेतन, सार्वजनिक तक्रारी आणि प्रशासकीय सुधारणा (पंतप्रधानांशी संलग्न) राज्यमंत्री बनवण्यात आले. तिथे त्यांनी प्रशासनाला जनतेपर्यंत नेण्याची आणि प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्याची प्रक्रिया सुरू केली. काही काळ विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून काम केले. 1999 ते 2004 या काळात त्या महिला सक्षमीकरणावरील संसदीय समितीच्या अध्यक्षा होत्या.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनी जाहीर केली उमेदवारी

राज्यपालपदाची कारकीर्द

मार्गारेट अल्वा यांनी ऑगस्ट 2014मध्ये त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत गोव्याचे 17वे राज्यपाल, गुजरातचे 23वे राज्यपाल, राजस्थानचे 20वे राज्यपाल आणि उत्तराखंडचे चौथ्या राज्यपाल म्हणून काम केले आहे. यूपीएतर्फे आता त्यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दरम्यान, उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची घोषणा शनिवारी संध्याकाळी एनडीएने केली. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांचे नाव घोषित केले तसेच त्यांचे अभिनंदनही केले होते.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.