BREAKING | शरद पवारांनी शड्डू ठोकला, थेट राष्ट्रपतींना भेटणार

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.

BREAKING | शरद पवारांनी शड्डू ठोकला, थेट राष्ट्रपतींना भेटणार
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 1:51 PM

मुंबई: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर गेल्या 10 दिवसांपासून हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. यात देशभरातील जवळपास 40 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत. आता माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवार यांच्यासोबत अन्य राजकीय पक्षांचे काही नेते उपस्थित असणार आहेत. (Sharad Pawar will meet President Ramnath Kovind on Agricultural law and farmer protest)

शरद पवार हे सीताराम येचुरी आणि डी. राजा यांच्यासह राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीत शेतकरी आंदोलनाविषयी चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 11 वा दिवस आहे. गेल्या 10 दिवसांत शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये काही बैठकाही झाल्या आहेत. पण त्यातून योग्य तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच सर्व शेतकरी संघटनांनी आता 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे.

कृषी कायद्यांना सरसकट विरोध नाही, पण…

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना आमचा सरसकट विरोध नाही. मात्र, शेतकऱ्यांच्या मालाला किंमत 100 टक्के मिळाली पाहिजे. त्याबाबत बंधन असलं पाहिजे. नव्या कायद्यात सक्तीचा अभाव आहे. त्याबाबत उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर लोकमत समुहाने त्यांची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत पवार यांनी ही भूमिका मांडली आहे.

महाराष्ट्रातील कृषी बाजार समितीची शेती आणि उत्तर भारतातील शेती यात फरक आहे. आपल्याकडे बाजार समित्यांची रचना साधारणपणे शेतकऱ्यांना मान्य असणारी आहे. आम्ही लोकांनीच विचारविनिमय केला. त्यात शेतकऱ्यांना काही स्वातंत्र्य देण्यात यावे, अशी सूचना समोर आली. त्याबाबत महाराष्ट्राने यापूर्वी निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की कृषी बाजार समिती कायम आहे. शेतकऱ्यांना याठिकाणी येऊन शेतमाल विक्रीचा अधिकार आहे. तिथे माल विकताना त्याची किंमत त्याच्या पदरात पडेल, यासाठी खरेदीदारावर बंधनं आजही इथं कायम आहेत,’ असंही पवार म्हणाले.

8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक

शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारच्या बैठकीत शेतकरी आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. पण कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. केंद्राने तिनही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी जाहीर केली आहे. त्याचबरोबर 8 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाकही शेतकरी संघटनांनी दिली आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलन आता चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या:

भाजपला शेतकरी आंदोलनाचा झटका; हरियाणात खट्टर सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची काँग्रेसची घोषणा

शेतकरी आंदोलनावरुन कंगना रानौत आणि दिलजित दोसांझमध्ये ट्विटर वॉर

Farmer Protest | महाराष्ट्रातही शेतकरी आंदोलनाचा वणवा पेटला; चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांचा आसूड कडाडला!

Sharad Pawar will meet President Ramnath Kovind on Agricultural law and farmer protest

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....