AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Attack : इकडं आड, तिकडं विहीर, पहलगाम हल्ल्यानंतर सनाला वाली कोण? आता कुठे जाणार?

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याचा आदेश जारी केला आहे. दररोज अनेक पाकिस्तानींना परत पाठवले जात आहे. पण मेरठमधील सना, जिचे लग्न पाकिस्तानात झाले आहे, ती भारतात राहू शकत नाही आणि पाकिस्तान तिला प्रवेश देत नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी तिची अवस्था झाली आहे.

Pahalgam Attack : इकडं आड, तिकडं विहीर, पहलगाम हल्ल्यानंतर सनाला वाली कोण? आता कुठे जाणार?
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Apr 26, 2025 | 10:14 AM
Share

पहलगाममध्ये झालेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचण्यास सुरूवात केली आहे. अनेक जण मायदेशी परतत आहेत. पण उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक महिला आहे, जी केंद्राच्या निर्णयानंतर भारतात राहू शकणार नाही. आणि पाकिस्तानही आता तिला प्रवेश देत नाहीये. त्यामुळे ती आता मध्यातच अडकली आहे. आता तिची बाजू कोण समजून घेणार असा प्रश्न उपस्थित होतोय.

45 दिवसांचा मिळाला व्हिसा पण…

मेरठमधील सरधना येथील मोहल्ला घोसियान येथील रहिवासी पिरुद्दीन यांची मुलगी सना हिचे लग्न पाकिस्तानातील इसमाशी झाले आहे. सुमारे एक आठवड्यापूर्वी, सना तिच्या दोन्ही मुलांसह भारतात आली. तिला 45 दिवसांचा व्हिसा मिळाला होता, पण त्याच दरम्यान पहलगाममध्ये पर्यटकांवर नृशंस हल्ला झाला. पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्याचा आदेश जारी झाल्यानंतर, मेरठ प्रशासनाने सनाशी संपर्क साधला आणि तिचा व्हिसा रद्द केला.तिला पाकिस्तानात परतण्यास सांगण्यात आलं.

शुक्रवारी सकाळी सना आणि दोन्ही मुलांना घेऊन गुप्तचर पोलिसांचे एक पथक वाघा बॉर्डरवर रवाना झाले. पण वाघा बॉर्डर बंद झाल्यामुळे सना आणि तिची दोन्ही मुले पाकिस्तानात प्रवेश करू शकली नाहीत आणि त्यांना अमृतसरमध्ये थांबवण्यात आलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सनाला पाठवण्याचे प्रयत्न सुरू

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत आणि त्यांना परत पाठवण्यात येत आहे. सरकारने आदेश जारी केल्यानंतर, पोलिस पथके लोकांशी संपर्क साधत आहेत आणि त्यांना सुरक्षितपणे सीमेवर घेऊन जात आहेत, अशा परिस्थितीत सानालाही परत पाठवण्यात आले होते परंतु पाकिस्तानी सीमा बंद झाल्यामुळे सना भारतात अडकली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सनाला पाकिस्तानात परत पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

150 पाकिस्तानींना परत पाठवलं

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, सरकारच्या आदेशानंतर अल्पकालीन व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत मेरठ झोनमधून 150 पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करण्यात आले आहे. सहारनपूर, मुझफ्फरनगर, शामली, मेरठ, बागपत, हापूर आणि बुलंदशहरसह 150 हून अधिक पाकिस्तानी नागरिकांना शुक्रवारी संध्याकाळपर्यंत हद्दपार करण्यात आले होते असे एडीजी झोन ​​भानू भास्कर यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशात 1800 पाकिस्तानी नागरिक आहेत, त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.