झोपेनं केला घोटाळा, चूक लक्षात आल्यावर म्हणाली, नको ते दिलं बाळाला…

नवजात बालकामुळे घरातील सर्वांची प्रामुख्याने माता पित्याची झोप अपुरी होत असते. याच अर्धवट झोपेत असताना एका महिलेने बाळाचा आहार कसा असावा हा ऑनलाईन लेख वाचला. मात्र, त्यामुळे मोठा घोटाळा झाला.

झोपेनं केला घोटाळा, चूक लक्षात आल्यावर म्हणाली, नको ते दिलं बाळाला...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 8:19 PM

नवी दिल्ली : आपल्या नवजात मुलाला काय खाऊपिऊ घालावं याची काळजी प्रत्येक पालकाला असतेच. यासाठी कधी कधी ते जुन्या जाणत्या ज्येष्ठांचा सल्ला घेतात तर कधी ऑनलाइन लेख वाचून बाळाला वयानुसार आहार देण्याचा प्रयत्न करतात. नवजात बालकामुळे घरातील सर्वांची प्रामुख्याने माता पित्याची झोप अपुरी होत असते. याच अर्धवट झोपेत असताना एका महिलेने बाळाचा आहार कसा असावा हा ऑनलाईन लेख वाचला. मात्र, त्यामुळे मोठा घोटाळा झाला. काही महिन्यांनी तिची सासू घरी आली तेव्हा तिने केलेल्या प्रश्नामुळे त्या महिलेच्या काळजात धस्स झालं. तिने तो लेख पुन्हा वाचला आणि…

एका महिलेने आपल्या बाळाला चांगला आहार मिळावा यासाठी बेबी फूड पोस्टर गाइडवरील एक लेख वाचला. हा लेख वाचत असताना तिला मध्येच झोप येत होती. या लेखामध्ये फळे, दूध, अंडी, कडधान्ये आणि तीन ते चार बर्फाचे तुकडे सातव्या महिन्यापासून मुलाला दिवसातून तीन वेळा द्यावेत असे लिहिले होते.

हे सुद्धा वाचा

त्या महिलेला ही गोष्ट विचित्र वाटली. पण, लेख लिहिणारी कंपनीचे नाव आहार क्षेत्रात नावाजलेले असल्यामुळे त्यांनी त्यावर विश्वास ठेवला. त्यानुसार बाळाला दररोज फळे, योग्य आहार आणि भाज्यांसह दोन तीन बर्फाचे तुकडे खायला देण्यास सुरुवात केली.

असे काही अनेक महिने गेले. त्या महिलेची सासू नातवाला पाहण्यासाठी आली. त्यावेळी तिने हे सर्व पाहून त्या महिलेला ओरडली. बाळाच्या आहारात बर्फ ? तुला मुलगा जिवंत हवा की नको ? तू काय करते आहेस ? असा बर्फ दिल्यामुळे बाळाचे हृदय गोठून जाईल असे सासूने सांगितले आणि महिलेच्या काळजाचा थरकाप उडाला.

सासूचे बोलणे ऐकून आपले काही चुकले तर नाही ना ? अशी शंका त्या जोडप्याला आली. त्यांनी तो लेख पुन्हा वाचला आणि आपण किती मोठी चूक केली हे त्यांच्या लक्षात आले.

काय लिहिले होते लेखामध्ये ?

जोडप्याने जो लेख वाचला त्यात आपल्याला तीन बर्फाचे तुकडे इतक्या प्रमाणात भाजीपाला किंवा आहार द्यावा असे लेखात म्हटले होते. पण, अर्धवट झोपेत त्यांनी तीन बर्फाचे तुकडे खायला द्यावे असे वाचले आणि हा गोंधळ झाला. झोपेमध्ये वाचलेल्या लेखामुळे त्यांच्या मुलाच्या जीवावर बेतले असते पण सासू घरी आल्यामुळे हा मोठा अनर्थ टळला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.