पतीला सोडून पळून गेली, लोकं म्हणाले मेली पण लाडकी बहिण योजनेचे पैसे काढायला गेली अन्
महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच लाडकी बहिण योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. सर्वात आधी ही योजना मध्य प्रदेशात सुरुवात करण्यात आली होती. पण या योजनेमुळे घरातून पळून गेलेली एक महिला सापडली आहे. लोकांनी एका मृतदेहावर अंत्यसंस्कार केले पण ती जिवंत निघाली
मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील भिंड जिल्ह्यात एका मृतदेहावर तो ज्योती शर्माचा मृतदेह समजून अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्योती शर्मा ही पती सुनील शर्माच्या घरातून 2 मे रोजी अचानक बेपत्ता झाली. सुनीलने तिचा शोधाशोध सुरु केला पण ती सापडली नाही. मग त्याने पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर दोनच दिवसात 4 मे रोजी एका एका शेतात महिलेचा जळालेला मृतदेह आढळून आला. पण हा मृतदेह तिचा नसल्याचं पतीने सांगितलं. ज्योतीच्या घरच्यांनी मात्र हा तिचाच मृतदेह असल्याचं सांगितलं. ज्योतीच्या घरच्या लोकांनी तिच्या मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याचा दबाव तिच्या सासरच्या लोकांवर टाकला.
आई-वडील आणि पोलिसांच्या दबावामुळे पती सुनील शर्माने महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. त्यांने सगळ्या विधी देखील केल्या. ज्योतीच्या माहेरच्या लोकांनी आरोप केल्यानंतर पोलिसांनी सुनीलला मारहाण केल्याचं देखील समोर आलंय. पण हा मृतदेह ज्योतीचाच आहे हे सत्य मानायला सुनील तयार नव्हता. सुनीलवर पत्नीच्या हत्येचा आरोप करण्यात आला.
सुनीलने सांगितले की, तो मृतदेह त्याच्या पत्नीचा नाहीये. नंतर दिवस सरत गेले आणि सुनील आणि त्याच्या कुटुंबावर पोलिसांचा दबाव वाढत गेला. अचानक एक दिवस सुनील पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचला, तेव्हा त्याला समजले की ज्योतीच्या बँक खात्यातून ₹ 2700 रुपये काढण्यात आलेत.
मध्य प्रदेशमध्ये ‘लाडकी बहिण योजने’अंतर्गत मिळालेली रक्कम हे सेंटरवर अंगठ्याचा ठसा देऊन काढण्यात आली होती. याची माहिती मिळताच त्याने शोध घेतला की ही रक्कम कुठून काढण्यात आली. ही गोष्ट त्याने पोलिसांना सांगितली. सुनील पोलिसांसह नोएडाला पोहोचला, तेव्हा अचानक फूटपाथवर ज्योती तिची तुटलेली चप्पल दुरुस्त करताना दिसली.
पोलिसांनी ज्योतीला न्यायालयात हजर केल्यानंतर तिच्या मामाच्या ताब्यात दिले. 53 दिवसांनी ज्योती जिवंत सापडली मात्र आता पोलिसांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, ज्या मृतदेहाचे शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार ज्योती समजून करण्यात आला तो मृतदेह कोणाचा होता.
मध्य प्रदेशात सुरुवातीला लाडकी बहिण योजनेतून महिलांना दरमहा एक हजार रुपये दिले जात होते. तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सहा महिन्यांनी ही रक्कम वाढवून 1250 रुपये प्रति महिना केली. त्यानुसार महिलांना वर्षाला 15 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.