शिवसेना नेत्यावर भररस्त्यात निहंग शिखांकडून हल्ला, तलवारीने केले वार

भररस्त्यात शिवसेना नेत्यावर झालेल्या हल्ल्याने शहर हादरले आहे. निहंग सिखांच्या वेशात हल्लेखोर आले होते. शिवसेना नेता आपल्या गाडीवरुन जात असताना अचानक त्यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शिवसेना नेत्यावर भररस्त्यात निहंग शिखांकडून हल्ला, तलवारीने केले वार
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 4:33 PM

पंजाबमधील लुधियाना येथे निहंग शिखांनी शिवसेना टकसाली नेत्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात शिवसेना टकसाली नेता गंभीर जखमी झाले आहेत. निहंग शिखांनी भर रस्त्यात शिवसेना टकसाली नेत्यावर तलवारीने अनेक वेळा वार केले. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना टकसाली नेते संदीप थापर हे शुक्रवारी सकाळी संवाद ट्रस्टच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. ते स्कूटरवरून जात असताना अचानक आलेले निहंग शीख यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाने संदीप याच्यांवर धारदार तलवारीने हल्ला करण्यास सुरुवात केली.

संदीप थापर यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला केल्यानंतर संदीप हे रस्त्यावरच पडले. यानंतर निहंग शीख स्कूटरवरून पळून गेले.

घटना घडली त्यावेळी शेजारी अनेक लोक उभे होते. मात्र, आरोपीच्या जवळ जाण्याचे धाडस कोणीच दाखवू शकले नाही. निहंग शीख तिथून पळून गेल्यावर संदीप थापर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या संदीप थापर यांच्यावर उपचार सुरू आहेत.

शिवसेना नेत्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निहंग शिखांच्या वेशात आलेले हल्लेखोर शिवसेना टकसाली नेते संदीप थापर उर्फ ​​गोरा यांच्यावर हल्ला करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

संदीप थापर यांच्यासोबत नेहमी बंदूकधारी असतात. मात्र हल्ल्यावेळी तो मूक प्रेक्षक बनला होता. तेथे उपस्थित लोकांनी शिवसेना नेत्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

शिवसेना टकसालीचे नेते संदीप थापर आपल्या भाषणात खलिस्तानविरोधात बोलतात. या कारणावरून त्यांना सतत धमक्या येत आहेत. याआधीही जेव्हा त्यांना सतत धमक्या येत होत्या तेव्हा त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी बंदूकधारी तैनात करण्यात आले होते.

Non Stop LIVE Update
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले
मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस; शाळांना सुट्टी, शिक्षणमंत्री काय म्हणाले.
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले
मुंबईच्या या दुरावस्थेला प्रशासनच जबाबादार - वडेट्टीवार संतापले.
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज
मुसळधार पावसाचा फटका, मुंबई मनपा कंट्रोल रुम रात्रीपासून सज्ज.
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा
दाणादाण करत पावसाचं कमबॅक, लोकल ठप्प; चाकरमान्यांचा प्रचंड त्रागा.
Mumbai Rains Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका
Mumbai Rains Update : मुंबईतील मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका.