Gyanvapi raw: ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेचा अहवाल आज कोर्टात! तळघराचा सर्व्हे करा, कारंजा असेल तर पाण्याची टाकी दाखवा, हिंदू पक्षकारांची मागणी
सापडलेले शिवलिंग हे शिवलिंग नसून कारंजा असल्याचे मुस्लीम पक्षकार सांगतायेत, असे असेल तर त्यांनी तो कारंजा सुरु करुन दाखवावा, त्या कारंजाला होणाऱ्या पाणी पुरवठ्याची व्यवस्थाही दाखवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वाराणसी : ज्ञानवापी मशीद (Gyanvapi raw) प्रकरणात बुधवारी होणारी सुनावणी टळली होती. आता आज (गुरुवारी) या प्रकरणाचा अहवाल (report in court)कोर्टात सादर करण्यात येणार आहे. वकिलांनी केलेल्या संपामुळे बुधवारी सुनावणी झाली नाही, ती आता आज होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. यापूर्वी हिंदू पक्षकारांच्या (Hindu)वकिलांनी माध्यमांसमोर येऊन दोन मागण्या केल्या आहेत. हिंदू पक्षकारांचे हरीशंकर जैन आणि विष्णू जैन यांनी माध्यमांसमोर या मागण्या ठेवल्या आहेत. आज होणाऱ्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचंय.
पहिली मागणी काय?
यातल्या ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले त्या ठिकाणी तळघरापर्यंत सर्वेक्षण करण्याची गरज हिंदू पक्षकरांनी व्यक्त केली आहे. समो असलेली भिंत स्वच्छ करुन चांगल्या प्रकारे तिथे व्हिडीओ शूटिंग करण्याची मागणीही करण्यात आली आहे. कोर्टाला याबाबत करत अलेल्या विनंतीनुसार आणि तथ्यांनुसार निर्णय देईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दुसरी मागणी
तर सापडलेले शिवलिंग हे शिवलिंग नसून कारंजा असल्याचे मुस्लीम पक्षकार सांगतायेत, असे असेल तर त्यांनी तो कारंजा सुरु करुन दाखवावा, त्या कारंजाला होणाऱ्या पाणी पुरवठ्याची व्यवस्थाही दाखवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कारंजा असेल तर चौकशी करण्यास मुस्लीम पक्षकारांचा विरोध का, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. नंदीच्या असलेल्या मूर्तीसमोरुन व्यासांच्या कक्षातून शिवलिंगापर्यंत रस्ता आहे, असा दावाही करण्यात आला आहे. कोर्टाने या ठिकाणी खोदकाम करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
पाहा स्पेशल रिपोर्ट :
सर्व्हे रिपोर्ट तयार करण्याची मागणी
6 आणि 7 मे रोजी ज्ञानवापी परिसरात करण्यात आलेला स,र्वे हा अजय मिश्रा यांच्या नेतृत्वातच करण्यात आला होता. अजयकुमार यांच्या सहभागाशिवाय हा अहवाल अपूर्ण असल्याचे हिंदू पक्षकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्यमुक्त करण्यात आलेल्या मिश्रा यांच्याकडूनच सर्वेचा अहवाल तयार करण्यात यावा, यासाठी कोर्टाला विनंती पत्र देणार असल्याची मागणीही करण्यात आली आहे. अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणी मुस्लीम पक्षकारांनी केली होती. मात्र तेव्हा कोर्टाने त्यांना हटवण्यास नकार दिला होता. मात्र नंतर सर्वेतील माहिती लीक करण्याच्या प्रकरणात कोर्टाने त्यांना प्रकरणातून पदमुक्त केले आहे.
2 विनंती अर्जांवर सुनावणी अद्याप बाकी
हिंदू पक्षकार यात मा शृंगार गौरी प्रकरणातील सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक यांच्याकडून पुन्हा एकदा सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली आहे. ज्ञानवापी परिसरातील काही भिंती पाडून सर्वेक्षणाची मागणी यात करण्यात आली आहे.
- ज्ञानवापीत जिथे शिवलिंग मिळाले, तिथे आणि आजूबाजूला वजू करण्यास मनाई करण्यात यावी
- शिवलिंगाच्या पूर्व आणि उत्तर दिशेची भिंत तसेच नंदीच्या उत्तर दिशेची भिंत तोडून तिथला ढिगारा हटवण्यात यावा
- शिवलिंगाची लांबी, रुंदी, उंचीची माहिती मिळवण्यासाठी आयोगाकडून कारवाई व्हावी.
- पश्चिम दिशेची भिंत तोडून मंडपाचे व्हिडिओ शूटिंग करण्यात यावे.
यासह ज्ञानवापीत असलेला मानवनिर्मित तलाव सील करण्यात यावा, तिथे वजू करण्यासाठी बाहेर व्यवस्था करण्यात यावी, त्या पिरसरातील शौचालय हटवण्यात यावे. या मागण्याही दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आल्या आहेत.