Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्रींसोबत लग्नासाठी निघालेली शिवरंजनी बागेश्वर धाम येथे पोहोचताच म्हणाली….

Bageshwar Dham : गंगोत्रीपासून 1200 किलोमीटरचा पायी प्रवास करुन शिवरंजनी इथे आलीय. शिवरंजनीने तिच्यावर झालेल्या आरोपांवर सुद्धा उत्तर दिलं.

Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्रींसोबत लग्नासाठी निघालेली शिवरंजनी बागेश्वर धाम येथे पोहोचताच म्हणाली....
dhirendra shastri-shivranjani
Follow us
| Updated on: Jun 16, 2023 | 11:45 AM

नवी दिल्ली : अवघ्या 20 वर्षांची शिवरंजनी तिवारी अचानक चर्चेत आली. तिचं चर्चेत येणं देखील स्वाभाविक आहे. कारण शिवरंजनीला बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींसोबत लग्न करायच आहे. शिवरंजनीने धीरेंद्र शास्त्रीसोबत लग्न करण्याचा संकल्प सोडलाय. याच संकल्पाच्या पुर्तीसाठी डोक्यावर कलश घेऊन ती छतरपूर येथे पोहोचली. गंगोत्रीपासून तिने 1200 किलोमीटरचा पायी प्रवास केला. शिवरंजनी चर्चेत येताच, तिच्यावर अनेक आरोप सुद्धा झाले.

आपल्यावर झालेल्या आरोपांवर शिवरंजनीने आता मौन सोडलय. “बागेश्वर धाम सरकारच्या पीठाधीश्वरांसोबत लग्न करण्याचा मी कधी विचारच केला नाही. धीरेंद्र शास्त्रींसोबत लग्नाच्या प्रस्तावावर मी कधीच विचार केला नाही. माझी तशी कुठली इच्छा नाहीय” असं शिवरंजनी म्हणाली.

शिवरंजनी काय म्हणाली?

हे सुद्धा वाचा

“मी त्यांच्यासोबत लग्नाचा संकल्प घेऊन निघालीय, असं मी कधी आणि कुठे म्हटलं? असा कुठे व्हिडिओ असेल, तर मला दाखवा. बालाजी महाराजांच दर्शन आणि करीयरमध्ये यश मिळवण्याचा संकल्प सोडला होता” असं शिवरंजनी म्हणाली.

शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्यासोबत कुटुंबाच नातं

माझ्या कुटुंबाच शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्यासोबत नातं आहे, असं शिवरंजनी तिवारीने सांगितलं. “बागेश्वर महाराज सर्वांची चिठ्ठी काढतात, हे सर्वांना माहितीय. मी छतरपूरवरुन आलीय. त्यांच्या दर्शनासाठी जाणार. त्यांनी माझी चिठ्ठी लिहिली असेल, तर ते वाचून दाखवतील” असं शिवरंजनी म्हणाली. भगवी वस्त्र परिधान करण्यावर शिवरंजनी काय म्हणाली?

शिवरंजनी तिवारीच्या भगवी वस्त्र घालण्यावरुनही वाद झालाय. तिच्यावर अनेक आरोप झाले. त्यावर शिवरंजनी म्हणाली की, “कुठली स्त्री भगवी वस्त्र घालू शकत नाही, असं कुठेही लिहिलेलं नाहीय. जर कुठे लिहिलं असेल, तर मला दाखवा. भगवा रंग मला आवडतो. मी हिंदू आहे. त्यामुळे या रंगाची वस्त्र परिधन करणं माझा अधिकार आहे”

'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.
अंधारे म्हणाल्या रेड्याला कापणार; गुलाबरावांचं प्रत्युत्तर, मी तयार पण
अंधारे म्हणाल्या रेड्याला कापणार; गुलाबरावांचं प्रत्युत्तर, मी तयार पण.
'धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणतं मग...', अजित दादांचा कोणाला खोचक टोला?
'धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणतं मग...', अजित दादांचा कोणाला खोचक टोला?.
आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने
आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने.
मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, दादांसोबत राणे-सोमय्यांचे खटके
मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, दादांसोबत राणे-सोमय्यांचे खटके.
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली.
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...