तेजस्वी यादव यांनी वातावरण निर्माण केलंय, बिहारमध्ये परिवर्तन होणारच : चंद्रकांत खैरे

तेजस्वी यादव यांनी एका वेगळ्या वातावरण निर्माण केलंय. त्यामुळे बिहारमध्ये परिवर्तन होणं अटळ आहे, असं मत शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलंय.

तेजस्वी यादव यांनी वातावरण निर्माण केलंय, बिहारमध्ये परिवर्तन होणारच : चंद्रकांत खैरे
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 11:21 PM

पाटणा :  आरजेडी (RJD) नेते तेजस्वी यादव (tejashwi Yadav) यांनी बिहार विधानसभा Bihar Election) निवडणुकीचं वातावरण बदलून टाकलंय. बिहारच्या जनतेला बदल हवाय, हे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे बिहारमध्ये नक्कीच परिवर्तन पाहायला मिळेल, असा विश्वास शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांंनी व्यक्त केला. (Shivsena Chandrakant Khaire on Bihar Vidhansabha Election)

चंद्रकांत खैरे आज विधानसभा निवडणूक प्रचारासाठी बिहारमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी करत जेडीयू आणि भाजपला टोले लगावले. बिहारमध्ये एनडीएची अवस्था अतिशय वाईट झाली असून लवकरच जेडीयूदेखील एनडीएतून बाहेर पडेल, असा दावा त्यांनी केला.

“बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जितके नेते आले त्यांना कोरोना झाला. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. पण भीती वाटत असली तरी लोकांनी हक्काने मतदान करून परिवर्तन आणायचे ठरवले आहे”, असं खैरे म्हणाले.

“भाजपने महाराष्ट्रात जसं शिवसेनेला डावललं त्याचप्रमाणे बिहारमध्ये आता नितीश कुमार यांना डावलले जात आहे. तुम्हीच मुख्यमंत्रिपदी असाल असं नितीश कुमार यांना भाजपने सांगितलं तर दुसरीकडे चिराग पासवान यांना JDU च्या विरोधात उमेदवार उभे करण्यास सांगितलं. त्यामुळे आता नितीशकुमार गडबडले आहेत. ते लवकरच एनडीएतून बाहेर पडतील”, असा दावा खैरे यांनी केला.

“मला नितीश कुमार यांना विचारायचंय की तरुणांच्या रोजगाराच्या आश्वासन आपण दिले होते, त्याचं काय झालं?,  कोरोना काळात स्थलांतरित कामगारांसाठी आपण आणि आपल्या सरकारने काय उपाययोजना केल्या ? असे सवाल करत आपण फक्त घोषणा केल्या बाकी काही नाही”, अशी टीका खैरे यांनी केली.

“कोरोना असताना भाजपला आणि जेडीयूला निवडणुकांची एवढी घाई का झाली? महाराष्ट्रात सगळ्या निवडणुका पुढे ढकलल्या असताना इथे निवडणुका पुढे का ढकलल्या नाहीत?”, असा सवाल खैरेंनी उपस्थित केला.

“बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जितके नेते आले त्यांना कोरोना झाला, त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस बिहारला आले आणि महाराष्ट्रात कोरोना घेऊन गेले”, असा टोला खैरेंनी लगावला.

महाराष्ट्रात ज्या प्रमाणे महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्याचप्रमाणे बिहारमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, असं भाकितही खैरे यांनी वर्तवलं. आज जामीन मिळूनही लालू जेलमध्ये आहेत, हे लोकांना पटत नाहीये, लोकांची सहानुभूती त्यांना मिळत आहे. लालूंच्या मुलाने नवं वातावरण तयार केलं आहे, असं ते म्हणाले.

“भाजपच्या मोफत लसीच्या घोषणेसाठी निवडणूक आयोगाने कारवाई करायला हवी. निवडणूक म्हणून फक्त बिहारला लस मग सगळयांना लस का नाही? केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करत नाही, पण इथे लस मोफत, यातूनच सरकारचं वर्तन आपल्याला दिसून येतं. पंतप्रधान मोदींची भाषणे हवी तशी होत नाहीत”, असा टोलाही त्यांनी सरतेशेवटी लगावला.

(Shivsena Chandrakant Khaire on Bihar Vidhansabha Election)

संबंधित बातम्या

लोकांना नितीश कुमार नको, बिहारचे पुढचे मुख्यमंत्री तेजस्वी यादवच : संजय निरुपम

बिहारचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची : संजय राऊत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार, नड्डा, नितीशकुमार, तेजस्वी यादव यांचा रॅलीचा धडाका!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.