धक्कादायक, शाळेत काही तरुण पोहचले हत्यारं घेऊन, मुलींना म्हणाले दोस्ती करा नाहीतर…

पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु असल्याचे सांगितले आहे. पाच नामांकित गुन्हेगार आणि इतर काही तरुणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी यात आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला आहे.

धक्कादायक, शाळेत काही तरुण पोहचले हत्यारं घेऊन, मुलींना म्हणाले दोस्ती करा नाहीतर...
शाळेत धक्कादायक प्रकार Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 9:20 PM

रांची – राजधानीच्या शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातल्या एका शाळेत काही तरुण हे हत्यारे (youth with weapons)घेऊन पोहचले. ही हत्यारे दाखवत त्यांनी शाळेतील मुलींना (School girls) मैत्री करा, अशी धमकीच दिली. (threat) जर तरुणांशी मैत्री केली नाही तर थेट उचलून नेण्याचा इशारा देण्यात आला. या तरुणांना विरोध करणाऱ्यांना मारहाण केल्याची माहितीही समोर आली आहे. झारखंड राज्याच्या राजधानीत रांचीत हा सगळा प्रकार घडला आहे. हे प्रकरण पालकांनी गांभिर्याने घेतल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात आरोपींविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

नेमका काय घडला प्रकार

ही घटना शनिवारी ओरमांझीतील प्रोजेक्ट प्लस २ या शाळेत घडली आहे. काही तरुण मुलांनी हत्यारे दाखवत मुलींनी मैत्री करावी अशी थएट धमकीच दिली. हा सगळा प्रकार मुलींनी त्यांच्या पालकांना सांगितला आहे. या घटनेनंतर शनिवारी शाळेच्या परिसरातच एक बैठक पार पडली. या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवा करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शाळेचे शिक्षक सहभागी झाले होते. यात घडलेला सगळा प्रकार या मुलींनी सगळ्यांच्या कानावर घातला.

यातील काही तरुण हे आपल्या मित्रांना बोलवून शाळेजवळ व्यसने करीत असत. तिथेच त्यांचा अड्डा असे. येणाऱ्या जाणाऱ्या मुलीवंर ते कॉमेंटही पास करीत. कुणीच त्यांना टोकत नसल्याचे त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे शाळेच्या आवारात घुसून त्यांनी मुलींना छेडण्यास सुरुवात केल्याचीही माहिती आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने त्यांना मज्जाव केल्यानंतर त्यांनाही धमक्या देण्यात येत होत्या. यातील काही तरुण याच शाळेतून बडतर्फ करण्यात आलेले असल्याचीही माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

स्थानिकांमध्ये संताप

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. त्यानंतर या प्रकरणाची माहिती ओरमांझी पोलीस ठाण्यात देण्यात आली. एका विशिष्ठ धर्मियांकडून देण्यात आलेल्या या धमकीमुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु असल्याचे सांगितले आहे. पाच नामांकित गुन्हेगार आणि इतर काही तरुणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी यात आरोपींची नावे सांगण्यास नकार दिला आहे.

या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे. पोलीस अधीक्षकांनीही हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे. पाच जणांची एसआयटी तयार करुन या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिासांनी सांगितले आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.