Shripad Naik | हायवेवरील शॉर्टकट जीवघेणा, अपघातात श्रीपाद नाईक अत्यवस्थ, पत्नी आणि पीएचा मृत्यू
कर्नाटकातील अंकोला येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले आहेत, तर त्यांच्या पत्नी विजया नाईक आणि पर्सनल सेक्रेटरीचा मृत्यू झाला आहे.
कर्नाटक : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांच्या गाडीला सोमवारी भीषण (Shripad Naik Accident) अपघात झाला. ते कुटुंबासोबत गोकर्ण येथे जात होते. यादरम्यान कर्नाटकातील अंकोला येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले आहेत, तर त्यांच्या पत्नी विजया नाईक आणि पर्सनल सेक्रेटरीचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपाद नाईक यांनी गोकर्णला लवकर पोहोचण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 (NH 63) वरुन शॉर्टकट घेतला. याचं रस्त्यावर त्यांचा अपघात झाला (Shripad Naik Accident).
शॉर्टकट घेण्याचा निर्णय जीवावर बेतला
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपाद नाईक यांनी ज्या शॉर्टकटने जाण्याचा निर्णय घेतला होता तो रस्ता खूप खराब होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हे समोर आलंय की घटनास्थळी कुठल्याही दोन वाहनांमध्ये धडक झालेली नाही. पण, रस्ता खराब असल्याने ड्रायव्हरचा कारवरील ताबा सुटला आणि गाडीला अपघाकत होऊन गाडी दरीत उलटली.
Karnataka: Union Minister Shripad Naik & his wife injured after his car met with an accident near a village in Ankola Taluk of Uttara Kannada dist. They were enroute Gokarna from Yellapur when the incident took place. They’ve been admitted to a hospital. A Police case registered. pic.twitter.com/ABMdx9ewoC
— ANI (@ANI) January 11, 2021
पत्नी आणि पर्सनल सेक्रेटरीचा मृत्यू
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी उशिरा रात्री दिलेल्या माहितीनुसार, अपघातात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर सध्या गोव्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दुर्घटनेत नाईक यांच्यासोबत गाडी असलेल्या त्यांच्या पत्नी विजया नाईक आणि पर्सनल सेक्रेटरीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे श्रीपाद नाईक हे अत्यवस्थ असल्याची माहिती आहे.
उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापुरा येथे ही घटना घडली. यावेळी मंत्री नाईक हे कर्नाटक येथील धर्मस्थळावरुन गोव्याला परत येत होते. उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापुराजवळ केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची गाडी पलटी झाली. नाईक हे त्यांच्या पत्नीबरोबर जात असताना ही दुर्घटना झाली. अपघातानंतर नाईक यांच्या पत्नी बेशुद्ध होत्या आणि त्या बराच वेळपर्यंत शुद्धीवर आल्या नाहीत. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
मोदींचा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन
Prime Minister Narendra Modi has spoken to Goa Chief Minister Pramod Sawant to ensure proper arrangements for the treatment of Union Minister Shripad Naik, at Goa. https://t.co/txAQZm0Lz6
— ANI (@ANI) January 11, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा येथे श्रीपाद नाईक यांच्यावर योग्य उपचारासाठी होत आहेत की नाही हे सुनिश्चित करण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली. नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना श्रीपाद नाईक यांच्या उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
श्रीपाद नाईक यांच्या गाडीचा चुराडा
कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून जात असताना श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी पलटल्याचे सांगितलं जात आहे. श्रीपाद नाईक यांच्यासह इतर तीन जण किरकोळ जखमी झालेत. हा अपघात किती भीषण होता या अंदाज श्रीपाद नाईक यांच्या गाडीवरुन येतो. अपघातानंतर नाईक यांच्या गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघातानंतर त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमध्ये अडकल्याचं दिसून येतं. त्यांच्या गाडीचं वरचं छत पूर्णपणे दबलं गेलं आहे. तसेच, बोनटचा देखील चक्काचूर झाला आहे. त्यांच्या गाडीचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्यंचं दिसून येत आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करत तपासाला सुरुवात केली आहे.
Shripad Naik Accident
संबंधित बातम्या :
Shripad Naik | अपघातानंतर चक्काचूर, पाहा श्रीपाद नाईकांच्या गाडीची अवस्था
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू