मुलगा शहीद, सून निघून गेली, आमच्याकडे उरला फक्त फोटो, कॅप्टन अंशुमनच्या आई-वडिलांच दु:ख

शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी सूनेवर गंभीर आरोप केले आहेत. 5 जुलैला कॅप्टन शहीद अंशुमन सिंह यांना मरणोपरांत किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं. हा सम्मान स्वीकारण्यासाठी अंशुमन सिंह यांची आई आणि पत्नी राष्ट्रपती भवनात आलेल्या.

मुलगा शहीद, सून निघून गेली, आमच्याकडे उरला फक्त फोटो, कॅप्टन अंशुमनच्या आई-वडिलांच दु:ख
siachen martyr captain anshuman singh parents
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 4:08 PM

“माझ्याकडे ना सून आहे, ना मुलगा…आणि ना तो सम्मान (किर्ती चक्र) जे हातात घेऊन पाहू शकीन किंवा फोटो काढता येईल. आमच्या यूपी, बिहारमध्ये सुना अशा नसतात. त्या आमच्यासोबतच राहतात….” हे शब्द आहेत, किर्ती चक्राने सम्मानित झालेल्या शहीद अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांचे. 5 जुलैला कॅप्टन शहीद अंशुमन सिंह यांना मरणोपरांत किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं. शहीद अंशुमन यांची आई आणि त्यांची पत्नी हा सम्मान स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवनात आलेल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंशुमन सिंह यांच्या पत्नी स्मृती सिंह यांना किर्ती चक्राने सन्मानित केलं. सोबत अंशुमन यांची आई होती. अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांनी सुनेवर गंभीर आरोप केलाय. अंशुमन सिंहची आई मंजू सिंह म्हणाल्या की, “पाच महिन्याच लग्न होतं. मुलगा शहीद झाला. सून किर्ती चक्र घेऊन माहेरी निघून गेली. आमच्याकडे काय उरलं?. अशी बरीच प्रकरण घडतायत. सूना पळून जातायत. त्यांच्या हातात सम्मान देऊ नये. राहुल म्हणालेत की, ते राजनाथ सिंह यांच्याशी बोलतील”

‘कारण सूना निघून जातात’

शहीद कॅप्टन अंशुमन सिंहचे वडील रवी प्रताप सिंह म्हणाले की, ‘सून कीर्ती चक्र घेऊन गेली. बस, फक्त मुलाचा फोटो उरलाय’ “सरकारने एकदा NOK च्या मुद्यावर विचार करावा. कारण सूना निघून जातात. असं बऱ्याच ठिकाणी झालय” असं शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या आई-वडिलांच म्हणण आहे.

तेराव्या पर्यंत सोबत राहिली

“आम्ही आमच्या सूनेवर प्रेम करायचो. माझी सून सुंदर होती. चांगली होती. माझी सून आणि मुलगी नोएडामध्ये एकत्र रहायचे. सूनेला जेवण किंवा चहा बनवणं नाही जमायचं. म्हणून मी माझ्या मुलीला सूनेकडे पाठवलं. माझा मुलगा ड्युटीवर गेला. त्यानंतर 4 महिने मी सूनेसोबत राहीली. माझा मुलगा शहीद झाल्यानंतर सून तेराव्या पर्यंत देवरियाच्या घरी राहिली. तेराव्याला तिच्या कुटुंबियांनी सांगितलं की, धार्मिक कार्यक्रमासाठी मुलीला घेऊन चाललेत. लवकरच परत आणून सोडू” असं अंशुमन यांच्या आईने सांगितलं.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.