Encounter | तोच थरार, तसाच दावा, कानपूर आणि हैदराबाद एन्काऊंटरमधील साम्य आणि फरक

डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्ना केशवुलू या चौघा आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी 5 डिसेंबरच्या मध्यरात्री एन्काऊंटर केला होता.

Encounter | तोच थरार, तसाच दावा, कानपूर आणि हैदराबाद एन्काऊंटरमधील साम्य आणि फरक
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 10:06 AM

मुंबई : कानपूरमधील आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणासह 60 पेक्षा अधिक गुन्हे असलेला कुख्यात गुंड विकास दुबे याचा चकमकीत खात्मा झाला. पहाटेच्या सुमारास झालेल्या या चकमकीमुळे हैदराबाद चकमकीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा सात महिन्यांपूर्वी चकमकीत मृत्यू झाला होता. (Similarity and Difference Between Hyderabad Encounter and Vikas Dubey Kanpur Encounter)

हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्ना केशवुलू या चौघा आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी 5 डिसेंबरच्या मध्यरात्री एन्काऊंटर केला होता. गुन्ह्याच्या पद्धतीची पुनर्निर्मिती करत असताना पळून जात असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता.

काय आहेत साम्य आणि फरक?

 हैदराबाद चकमककानपूर विकास दुबे चकमक
आरोपहैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन चौघा आरोपींनी तिचा मृतदेह पेटवला होता.हत्या प्रकरणात विकास दुबेला अटक करण्यासाठी गेलेल्या कानपूर पोलिसांच्या पथकावर दुबेच्या गुंडांकडून बेछुट गोळीबार करण्यात आला. या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिस शहीद झाले, तर सात पोलीस जखमी झाले.
जनक्षोभडॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्येमुळे आरोपीविरोधात देशभरातून संतापाची लाटपोलिसांवर हल्ला करुन हत्या केल्याने देशभरात विकास दुबेच्या गुंडशाहीचा निषेध
चकमकीची वेळमध्यरात्रीच्या काळोखात पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने चौघा आरोपींना कंठस्नान घातल्याचा पोलिसांचा दावापहाटेच्या वेळेस पोलिसांच्या ताफ्यातील गाडीच्या अपघाताचा गैरफायदा घेऊन आरोपीने पोलिसांच्या बंदुकीसह पळ काढला आणि गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा
अटक आणि चकमकघटनेनंतर दोन दिवसांनी अटक, अटकेनंतर आठवड्याभरात खात्माघटनेनंतर सहा दिवसांनी अटक, अटकेनंतर 24 तासात कंठस्नान

हैदराबादमध्ये काय घडलं होतं?

हैदराबादमधील शासकीय रुग्णालयातील पशुवैद्यक तरुणीवर नोव्हेंबर 2019 मध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर तिची हत्या करुन चौघांनी तिचा मृतदेह पेटवून दिला होता. 28 नोव्हेंबरला सकाळी 26 वर्षीय पीडितेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर 29 तारखेला चारही आरोपींना अटक झाली होती. या घटनेविरोधात अख्ख्या देशभरात संतापाची लाट उसळली होती.

बुधवार 27 नोव्हेंबरला संध्याकाळी डॉक्टर तरुणीला टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करुन जाताना चारही आरोपींनी पाहिलं होतं. त्यावेळी त्यांच्या डोक्यात कट शिजू लागला. त्यांनी तिच्या स्कूटीमधली हवा काढली. रात्री नऊ वाजताच्या सुमारास जेव्हा ती स्कूटी नेण्यासाठी तिथे पुन्हा आली, तेव्हा तिला टायर पंक्चर झाल्याचं लक्षात आलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

आरोपी मोहम्मद आरिफ तिच्याजवळ मदतीच्या बहाण्याने पोहचला. तर शिवा स्कूटी दुरुस्त करतो, असं सांगून ती दूर घेऊन गेला. त्यानंतर आरिफ, शिवा आणि नवीन तिला बळजबरी एका मोकळ्या जागेवर घेऊन गेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. स्कूटी दूरवर नेऊन सोडल्यानंतर शिवा परत आला आणि त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे.

डॉक्टर तरुणीवर बलात्कार करण्यापूर्वी आरोपींनी तिला बळजबरी मद्य पाजलं होतं. तिने मदतीसाठी याचना केली, मात्र नराधमांना पाझर फुटला नाही. किळसवाणी बाब म्हणजे तिने प्राण सोडल्यानंतर तिच्या मृतदेहासोबतही आरोपी बलात्कार करत राहिले.

हत्येनंतर आरोपी तिचा मृतदेह ट्रकवर टाकून निघाले. वाटेत पेट्रोल आणि डिझेल विकत घेतलं. रंगारेड्डी जिल्ह्यातील शादनगरमध्ये एका निर्जनठिकाणी त्यांनी तिचा मृतदेह टाकला. त्यानंतर पेट्रोल ओतून तिचा मृतदेह जाळला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

कशी झाली होती अटक आणि चकमक?

29 नोव्हेंबरला चारही आरोपींना अटक झाली होती. हैदराबाद पोलिस आरोपींना 5 डिसेंबरच्या मध्यरात्री साडेतीन वाजता घटनास्थळी घेऊन गेले होते. गुन्ह्याच्या पद्धतीची पुनर्निर्मिती करत असताना चौघांनी पोलिसांच्या तावडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या. गोळीबारात चौघांचाही जागीच मृत्यू झाला. ज्या ठिकाणी गुन्हा घडला, तिथून जवळच हैदराबाद-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर ही चकमक घडली होती.

विकास दुबे अटक ते खात्मा – असा आहे घटनाक्रम

गुरुवार 9 जुलै – सकाळी साडेसात वाजता – विकास दुबे उज्जैनमधील महाकाल मंदिरात पोहोचला. त्याने मंदिरात दर्शन घेतले. एका दुकानदाराने विकास दुबे याला ओळखले, त्यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांना कळवण्यात आले. यानंतर स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले.

सकाळी आठ वाजता – जेव्हा पोलीस मंदिराबाहेर आले, तेव्हा त्यांनी विकास दुबेकडे चौकशी केली, त्याचे ओळखपत्र मागितले. पण तो देऊ शकला नाही. विकास दुबेने पोलिसांशी हुज्जत घातली.

सकाळी साडेआठ वाजता – पोलिसांनी विकास दुबेला पकडले. तेव्हा तो जोरात ओरडत होता की मी विकास दुबे आहे, कानपूरवाला.

गुरुवार 9 जुलै – संध्याकाळी सात वाजता – विकास दुबेला मध्य प्रदेशातून उत्तर प्रदेशला आणण्याची कायदेशीर प्रक्रिया गुरुवारी संध्याकाळी सुरु. यूपी एसटीएफची टीम त्याला घेऊन कानपूरला रवाना.

शुक्रवार 10 जुलै – पहाटे 6.15 वाजता – एसटीएफच्या ताफ्यातील महिंद्र Tuv पहाटे सव्वासहा वाजताच्या सुमारास भौती भागात रस्त्यावर उलटली.

पहाटे 6.18 वाजता – अपघाताचा गैरफायदा घेऊन 6 वाजून 18 मिनिटांनी विकास दुबेने पोलिसांच्या बंदुकीसह पळ काढल्याचा पोलिसांचा दावा

पहाटे 6.19 वाजता – पोलिसांचे दुबेला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन, मात्र दुबेने पोलिसांवर गोळीबार केल्याचा आरोप

पहाटे 6.20 वाजता –  दुबे आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु, 10 ते 15 मिनिटे चाललेल्या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागल्या.

पहाटे 6.40 वाजता – विकास दुबेचा मृत्यू

संबंधित बातम्या 

गँगस्टर विकास दुबेचा खात्मा, STF ची गाडी उलटल्यानंतर पोलिसांशी चकमक

विकास दुबे पहाटे 6.18 ला पळाला, 6.40 ला खात्मा, 22 मिनिटात काय काय घडलं?

(Similarity and Difference Between Hyderabad Encounter and Vikas Dubey Kanpur Encounter)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.