धक्कादायक! रस्त्यावर लोंबकणाऱ्या विजेच्या तारेमुळे अख्ख्या बसमध्येच करंट पसरला; सहा प्रवाशांचा मृत्यू

ड्रायव्हरला रस्त्यावर एक वीजेची तार लोंबकळताना दिसल्यामुळे बस थांबवण्यात आली. | Bus accident in Rajasthan

धक्कादायक! रस्त्यावर लोंबकणाऱ्या विजेच्या तारेमुळे अख्ख्या बसमध्येच करंट पसरला; सहा प्रवाशांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 8:27 AM

जालोर: राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या विचित्र अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ही बस रस्त्यावरुन जात असताना वीजेच्या तारेचा स्पर्श होऊन वीजप्रवाह संपूर्ण गाडीत पसरला. त्यामुळे बसच्या क्लीनरचा आणि ड्रायव्हरसह सहाजणांचा दुर्दैवी अंत झाला. (Six died and seven injured as a bus caught fire after coming in contact with electric wire in Maheshpur of Jalore district in Rajasthan)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालोरच्या महेशपूर गावात ही घटना घडली. या बसमध्ये बरेच प्रवाशी होते. रस्ता चुकल्यामुळे ही बस महेशपूर गावानजीक पोहोचली. त्याठिकाणी ड्रायव्हरला रस्त्यावर एक वीजेची तार लोंबकळताना दिसल्यामुळे बस थांबवण्यात आली. तेव्हा क्लीनर बसच्या टपावर चढला आणि त्याने एका काठीच्या मदतीने वीजेची तार वर उचलून धरली.

त्यानंतर ड्रायव्हरने बस पुढे नेली. मात्र, तेव्हा क्लीनरच्या हातातली काठी सटकल्यामुळे वीजेची तार त्याच्या गळ्यात येऊन अडकली. क्लीनर बसच्या छतावर उभा असल्यामुळे वीजप्रवाह संपूर्ण बसमध्ये पसरला. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना वीजेचा झटका बसला. त्यानंतर वीजप्रवाहामुळे बसमध्ये आगही लागली.

बसचा चालक आणि क्लीनरचा मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आतापर्यंत पोलिसांनी बसमधून काही मृतदेह बाहेर काढले आहेत. बसमध्ये आणखी काही मृतदेह असल्याची शंका आहे. तर जखमींवर जोधपूरच्या एमडीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई-पुणे-एक्स्प्रेस वेवर ट्रेलरला आग, जीवितहानी नाही

रायगड: मुंबई-पुणे-एक्स्प्रेस वेवर अमृतांजन ब्रिजजवळ ट्रेलरला लागली आग लागली आहे. पुणे आज पहाटे ही घटना घडली आहे. ही घटना घडताच आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस, डेल्टा फोर्स आणि देवदूत यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून येथील वाहतूक पुन्हा सुऱळीत झाली आहे.

इतर बातम्या:

रायगडमध्ये वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, 3 जणांचा अपघातात मृत्यू

भाजप आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू, किसन कथोरे जखमी

(Six died and seven injured as a bus caught fire after coming in contact with electric wire in Maheshpur of Jalore district in Rajasthan)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.