Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहा वर्षाची मुलगी तापाने त्रस्त, पण ती डगमगली नाही, अल्पवयीन मुलींसाठी तिने घेतला धाडसी निर्णय

एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचीही अशीच एक कहाणी पुढे आली आहे. मातृत्व निभवायचं की पोलीस कर्तव्य असा प्रश्न तिच्यासमोर उभा ठाकला. मात्र, तिने त्यावेळी जे काही केले ते पाहून तिला एक कडक सॅल्यूट...

सहा वर्षाची मुलगी तापाने त्रस्त, पण ती डगमगली नाही, अल्पवयीन मुलींसाठी तिने घेतला धाडसी निर्णय
INDUR NEWSImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 9:34 PM

इंदूर : समाजात अनेक अप्रिय घटना घडत असताना माणुसकी जपणाऱ्या काही घटना समोर येत असतात. पोलिसांबाबत तर अनेक सुरस कथा नव्याने ऐकायला मिळत असतात. मात्र, याच पोलिस दलातही अनेक पोलीस असे आहेत की त्यांना कर्तव्यापेक्षा मोठे असे काहीच वाटत नाही. इंदूरमधील एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचीही अशीच एक कहाणी पुढे आली आहे. मातृत्व निभवायचं की पोलीस कर्तव्य असा प्रश्न तिच्यासमोर उभा ठाकला. मात्र, तिने त्यावेळी जे काही केले ते पाहून तिला एक कडक सॅल्यूट… कारण, एका अल्पवयीन मुलीच्या सुटकेसाठी तिने स्वतःच्या मुलीच्या आजारपणाची चिंता न करता त्या मुलीला सोडवलेच शिवाय आरोपीला बेड्या ठोकून त्यालाही चांगलाच धडा शिकविला.

इंदूर शहरातील परदेशीपुरा पोलिस स्टेशन हद्दीत 10 दिवसांपूर्वी एक घटना घडली. आरोपी हृतिक याची इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीची मैत्री झाली. त्या दोघांचे फोनवर बोलणे सुरु झाले. 26 मे रोजी आरोपी हृतिक याने तिला एके ठिकाणी बोलावले.

हे सुद्धा वाचा

त्या दोघांमध्ये काही तरी बिनसलं. हृतिक याने त्या अल्पवयीन मुलीला मारहाण केली. त्यानंतर त्याने जबरदस्तीने तिला बाईकवर बसवून गुजरातला पळवून नेले. इकडे त्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिस गुंतले. त्यांनी आरोपीचा तपास सुरु केला.

परदेशीपुरा पोलीस सतत आरोपी हृतिक आणि त्या अल्पवयीन मुलीची माहिती काढण्यात गुंतले. अशातच आरोपी हृतिक याच्या मोबाईलमुळे तांत्रिक टीमला त्यांच्या गुजरातमधील लोकेशनची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुजरातला जायचे ठरवले. मात्र, यात एक अडचण आली.

अल्पवयीन मुलीला परत मिळवण्यासाठी टीममध्ये महिला पोलिस कर्मचारी असणे आवश्यक होते. पण, त्या पोलीस स्टेशनमधील महिला एसआय रजेवर गेल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारी महिला हेड कॉन्स्टेबल रेखा कनासिया यांची वरिष्ठानी नेमणूक गुजरातला जाणाऱ्या टीममध्ये केली.

पोलिसांचे पथक सुरतेहून गुजरातला जाण्यासाठी निघणार त्याच दिवशी रेखा कनासिया यांची सहा वर्षाची मुलगी तापाने फणफणली होती. काय करावे या विवंचनेत असताना रेखा कनासिया यांनी तापाने त्रस्त असलेल्या आपल्या मुलीला सोबत घ्यायचे ठरवले.

गुजरात येथे आरोपीला पकडण्यासाठी निघालेल्या पथकात आता रेखा कनासिया यांच्यासोबत तापाने त्रस्त असलेली मुलगीही सामील झाली होती. त्या पोलीस पथकाने सुरत येथून आरोपी हृतिक याला अटक करून त्याच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका केली. यातही रेखा यांनी महत्वाची भूमिक बजावली.

आरोपी हृतिक याला अटक करून हे पथक पुन्हा इंदूरला परत आले. तिथून परत आल्यानंतर रेखा यांनी आपल्या मुलीला डॉक्टरांकडे नेत तिच्यावर उपचार केले. रेखा यांच्या या कर्तव्य भावनेपुढे सारे पोलीस दल नतमस्तक झाले.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.