Karnataka विधानपरिषदेत आमदारांनी खुर्चीवरुन खेचलेले उपसभापती रेल्वे रुळांवर मृतावस्थेत

कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती एसएल धर्मेगौडा यांचा मृतदेह मध्यरात्री दोनच्या सुमारास रेल्वे रुळांवर आढळला.

Karnataka विधानपरिषदेत आमदारांनी खुर्चीवरुन खेचलेले उपसभापती रेल्वे रुळांवर मृतावस्थेत
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 8:52 AM

बंगळुरु : कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती एसएल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दक्षिण कर्नाटकातील चिकमगळुर या धर्मेगौडांच्या मूळगावात हा प्रकार घडला. एसएल धर्मेगौडा यांची सुसाईड नोट सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. कर्नाटक विधानपरिषदेत अवघ्या 15 दिवसांपूर्वी झालेल्या राड्यात चार आमदारांनी धरत उपसभापतींना खुर्चीतून खाली खेचल्याचं पाहायला मिळालं होतं. (SL Dharme Gowda Karnataka Upper House Deputy Chairman Dies by Suicide)

धर्मेगौडा यांचा मृतदेह सोमवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास रेल्वे रुळांवर आढळला. 64 वर्षीय धर्मेगौडा हे लो प्रोफाईल आमदार म्हणून प्रसिद्ध होते. मात्र कर्नाटक विधानपरिषदेत झालेल्या राड्यामुळे ते चर्चेत आले. धर्मेगौडांच्या मृत्यूमुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांचे बंधू एसएल भोजेगौडाही विधानपरिषद आमदार आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे ते निकटवर्तीय आहेत.

गोहत्या प्रतिबंधक विधेयकावरुन राडा

कर्नाटक विधानसभेत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर झाले होते. त्यावेळी काँग्रेसने सभात्याग करत निषेध नोंदवला होता. ‘कर्नाटक मवेशी वध रोकथाम एवं संरक्षण विधेयक-2020’ असे या विधेयकाचे नाव होते. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास कर्नाटकात गोहत्येवर बंदी येईल. गायींची तस्करी आणि गोहत्येत सहभागी असणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या नियमांचा या विधेयकात अंतर्भाव आहे. हे विधेयक 2010 साली भाजपने आणलेल्या कायद्याचे सुधारित स्वरुप आहे. (SL Dharme Gowda Karnataka Upper House Deputy Chairman Dies by Suicide)

कर्नाटक विधानपरिषेदत 15 डिसेंबरला गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा झाला होता. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. भाजप आणि जनता दलाने (सेक्युलर) असंवैधानिक पद्धतीने उपसभापतींना खुर्चीत बसवले. हा प्रकार दुर्दैवी आहे. काँग्रेसने त्यांना आसनावरुन खाली उतरायला सांगितले. ते अवैधरित्या सभापतींच्या आसनावर बसल्यामुळे आम्ही त्यांना सभागृहाबाहेर काढले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार प्रकाश राठोड यांनी दिली होती.

काँग्रेसचा भाजपवरु आरोप

विधानपरिषदेचे सभापती असलेले काँग्रेस आमदार प्रकाशचंद्र शेट्टी यांना हटवून भाजपशी असंवैधानिकपणे हातमिळवणी केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. भाजपने सभापतींविरोधात अविश्वास ठराव पारित केला. त्यासाठी मतदान प्रक्रिया अद्याप बाकी होती.

काँग्रेसचे काही आमदार सभागृहात गुंडांसारखे वागले. त्यांनी उपसभापतींना आसनावरुन खेचले आणि त्यांच्याशी गैरवर्तन केले. कर्नाटक विधानपरिषदेच्या आजवरच्या इतिहासात आम्ही असा प्रकार पाहिला नव्हता. जनता आमच्याबद्दल काय विचार करत असेल हा विचार करुन मला शरम वाटत आहे, असे वक्तव्य भाजप आमदार लेहर सिंग सिरोया यांनी केले होते.

संबंधित बातम्या :

चार आमदारांनी धरलं आणि उपसभापतींना खुर्चीतून खेचलं, विधानपरिषदेत राड्याची हद्द

(SL Dharme Gowda Karnataka Upper House Deputy Chairman Dies by Suicide)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.