लडाखमध्ये मायनस 40 डिग्रीतही चीनला आव्हान देणार, थंडीसाठी भारतीय सैन्याची चोख व्यवस्था

थंडीच्या हंगामासाठी भारतीय सैन्याने आपल्या सैनिकांसाठी सीमालगत भागात अद्ययावत निवासी स्मार्ट कॅम्प बांधले आहेत.

लडाखमध्ये मायनस 40 डिग्रीतही चीनला आव्हान देणार, थंडीसाठी भारतीय सैन्याची चोख व्यवस्था
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 11:03 PM

लेह : लडाखमध्ये भारताचे चीनसोबत तणावपूर्ण संबंध कायम आहेत. त्याचपार्श्वभूमीवर या थंडीच्या हंगामासाठी भारतीय सैन्याने आपल्या सैनिकांसाठी सीमालगत भागात अद्ययावत निवासी स्मार्ट कॅम्प बांधले आहेत. यामुळे आता भारतीय सैनिक मायनस 40 डिग्री तापमानात देखील चीनला सडेतोड उत्तर देण्यास सक्षम असणार आहेत. या कॅम्पमुळे भारतीय सैन्याचं कडाक्याच्या थंडीत संरक्षण होऊन चीनचा जशासतसे प्रत्युत्तर देण्याची चोख व्यवस्था तयार झाली आहे (Smart camps set up for soldiers in Ladakh army ready to face cold and China).

भारतीय सैन्य तैनात असलेल्या लडाखच्या काही भागात थंडीच्या दिवसांमध्ये तापमान शून्यापासून -40 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होते. याशिवाय उंचीवरील ठिकाणी थंडीच्या काळात जवळपास 30 ते 40 फूट बर्फ जमा होण्याचा धोका असतो.

सैन्यातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा एक प्रकारचा स्मार्ट कॅम्प आहे. यात वीज, पाणी आणि हिटिंगसारख्या थंडीपासून वाचण्यासाठीच्या मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. या स्मार्ट कॅम्पला आरोग्य आणि स्वच्छता या दोन्ही दृष्टीने अत्याधुनिक बनवण्यात आलं आहे. या कॅम्पमुळे आता फ्रंटलाईनवर असलेल्या सैनिकांना आता कशाचीही कमतरता राहणार नाही आणि ते कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास सज्ज आहेत.

लडाखमधील स्मार्ट कॅम्पची वैशिष्ट्ये काय?

  • हे स्मार्ट कॅम्प तात्काळ कोणत्याही ठिकाणी लावता येणार
  • अनेक वर्षांच्या संशोधनानंतर या कॅम्पची निर्मितीत
  • कम्पमध्ये वीज, गरम पाणी, हिटिंगसारख्या अनेक सुविधा उपलब्ध
  • गरजेनुसार या कॅम्पचा उपयोग होणार
  • हे स्मार्ट कॅम्प -50 डिग्री तापमानातही जवानांचं थंडीपासून संरक्षण करणार

संबंधित बातम्या :

आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसू नका, भारतानं चीनला ठणकावलं

‘लेह चीनचा भाग नाही, तर भारताच्या लडाखची राजधानी’, चुकीच्या GEO टॅगवरुन भारतानं ट्विटरला सुनावलं

गुपकार घोषणा: “आम्ही भाजपविरोधी आहोत, देशविरोधी नाही”, पीपल्स अलायन्सच्या बैठकीत फारुक अब्दुल्ला गरजले

Smart camps set up for soldiers in Ladakh army ready to face cold and China

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.