Smriti Irani | ‘यू आर नॉट इंडिया’ राहुल गांधी यांच्या भाषणानंतर स्मृती इराणी संसदेत कडाडल्या

Smriti Irani | "भारत मातेची हत्या झाली, बोलल्यावर टाळ्या वाजवण्यात आल्या. यावरुन दिसून येतं, कोणाच्या मनात गद्दारीची भावना आहे." असं स्मृती इराणी म्हणाल्या. "मणिपूर विभाजीत नाहीय, तो देशाचा अविभाज्य भाग आहे"

Smriti Irani | 'यू आर नॉट इंडिया' राहुल गांधी यांच्या भाषणानंतर स्मृती इराणी संसदेत कडाडल्या
smriti irani Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 1:30 PM

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज संसदेत मणिपूर मुद्यावर आक्रमक भाषण केलं. त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली, असं राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या भाषणाचा केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी समाचार घेतला. भाषाणाच्या सुरुवातीलाच ‘यू आर नॉट इंडिया’ असं स्मृती इराणी म्हणाल्या.

“अध्यक्ष महोदय आज तुमच्या आसनासमोर ज्या प्रकारच आक्रमक वर्तन पहायला मिळालं, ते मान्य नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भारत मातेची हत्या केली, असं बोललं गेलं. काँग्रेस पक्ष त्यावेळी इथे टाळ्या वाजवत होता. भारत मातेची हत्या झाली, बोलल्यावर टाळ्या वाजवण्यात आल्या. यावरुन दिसून येतं, कोणाच्या मनात गद्दारीची भावना आहे. मणिपूर विभाजीत नाहीय, तो देशाचा अविभाज्य भाग आहे” असं स्मृती इराणी म्हणाल्या.

‘राहुल गांधी तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर….’

“तुमच्या सहकारी पक्षाचा नेता तामिळनाडूत काय म्हणाला? भारताचा अर्थ फक्त उत्तर भारत होतो. राहुल गांधी यांच्यामध्ये हिम्मत असेल, तर तुम्ही तुमचा सहकारी डीएमकेच म्हणणं खोडून दाखवा. काश्मीरला भारतापासून वेगळ केलं पाहिजे असं जो काँग्रेस नेता म्हणतो, त्यावर तुम्ही का बोलत नाही?” असं स्मृती इराणी म्हणाल्या.

‘काश्मिरी पंडितांवर बोलाव अशी तुमची इच्छा नाही’

“स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणात काश्मीर पंडितांवर झालेल्या अत्याचाराचा उल्लेख केला. स्मृती इराणी यांनी गिरिजा टिक्कू, शीला भट्ट यांच्यासोबत झालेल्या घटनांचा उल्लेख केला. आम्ही काश्मिरी पंडितांवर बोलाव अशी तुमची इच्छा नाही” असं स्मृती इराणी म्हणाल्या. जम्मू-काश्मीर मुद्यावरुन काँग्रेसला घेरलं

स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. “एकवेळ अशी होती की, काश्मीरमध्ये रक्तपात झालेला. पण राहुल गांधी जेव्हा काश्मीरमध्ये आपल्या नातेवाईकांसोबत पोहोचले, तिथे फिरत होते. हे मोदी सरकारने काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यामुळे शक्य झालं. काँग्रेस नेते पुन्हा तिथे गेले, त्यावेळी त्यांनी अनुच्छेद 370 लागू करण्याबद्दल भाष्य केलं” असं स्मृती इराणी म्हणाल्या.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.