सैनिक हो तुमच्यामुळेच भारत भूमी सुरक्षित, पंतप्रधानांनी लेप्चा येथे सैनिकांचे मानले आभार, केली दिवाळी साजरी

आपले सैनिक प्रत्येक आव्हानाला सामोरे जातात. जोपर्यंत माझे सहकारी साथी सैनिक हिमालयासारखे भारताच्या सीमेवर तैनात आहेत तोपर्यंत भारत सुरक्षित आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांचे आभार मानले आहेत.

सैनिक हो तुमच्यामुळेच भारत भूमी सुरक्षित, पंतप्रधानांनी लेप्चा येथे सैनिकांचे मानले आभार, केली दिवाळी साजरी
PM MODI Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 12, 2023 | 7:51 PM

नवी दिल्ली | 12 नोव्हेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे यंदाची दिवाळी सीमेवरील जवानांसोबत साजरी केली. हिमाचल प्रदेशातील लेप्चा येथे सैनिकांसोबत दिवाळी साजारी करण्यासाठी पोहचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणे हा क्षण अभिमानाचा होता असे म्हटले आनंद आणि समाधान देणारा हा क्षण, माझ्यासाठी, तुमच्यासाठी आणि देशवासियांसाठी दीपावलीचा नवा प्रकाश पोहचविणारा असेल असा आपला विश्वास असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आपले सैनिक प्रत्येक आव्हानाला सामोरे जातात. जोपर्यंत माझे सहकारी साथी सैनिक हिमालयासारखे भारताच्या सीमेवर तैनात आहेत तोपर्यंत भारत सुरक्षित आहे. तुमच्या सेवेमुळेच भारतीय भूमी सुरक्षित आहे आणि विकासाच्या मार्गावर प्रशस्त उभी आहे. गेल्या दिवाळी ते ही दिवाळीचा काळ भारतासाठी अनेक कारणांनी चांगला गेला. या अमृतकाळाच्या एक वर्षांत भारताची चंद्रयान मोहिम यशस्वी ठरली. आदित्य एल-1 लॉंच केले. याच एका वर्षांत सीमेवर आपण वायब्रंट व्हिलेजची सुरुवात केली. खेळाच्या मैदानात नवे विक्रम स्थापन केल्याचे मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले.

सैनिकांच्या शौर्याची स्तूती करताना मोदी यांनी पुढे म्हटले की माझ्यासाठी जेथे माझे भारतीय सैन्य आहे, सैनिक उभे आहेत, ती जागा मंदिराहून कमी नाही, जेथे तुम्ही आहात तेथेच माझे सण आहेत. कुटुंबाची आठवण सर्वांनाच येत असते. परंतू तरीही तुमच्या चेहऱ्यावर त्याची नाराजी कधी दिसत नाही. तुम्ही उत्साह आणि ऊर्जेने परिपूर्ण आहात, कारण तुम्ही जाणता की हा 140 कोटीचे कुटुंबही तुमचेच आहे. देश यासाठी तुमचा कृतज्ञ आहे असेही भावूक उद्गार मोदी यांनी यावेळी काढले.

सैनिकांचा अभिमान

आपल्या सैनिकांकडे नेहमीच या वीर भूमीचा वारसा राहीला आहे. त्यांच्यात नेहमी उत्साह, पराक्रम ठासून भरलेला असल्याने आपले जवान प्राणाची बाजी लावून नेहमी पुढे मार्गक्रमण करीत असतात. जगात कुठेही भारतीय संकटात असेल तर भारतीय सैनिक आणि सुरक्षा दले त्यांना वाचविण्यासाठी नेहमी तत्पर असतात. भारतीय सैनिक नेहमीच पुढे असतात.. त्यामुळे आम्हाला आमच्या सैनिकांचा अभिमान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.