PUBG साठी मुलाने केली आईची हत्या, 10 वर्षांच्या बहिणीसमोर आईला घातल्या गोळ्या, तीन दिवस मृतदेह घरात, बहीण मृतदेहाशेजारी होती कैद, आरोपी मात्र करत होता पार्टी
पोलीस नाकावर रुमाल लावून घरात पोहचले. खोलीत साधना यांचा मृतदेह पडलेला होता. त्यांचा मृतदेह इतका सडलेला होता की त्यांचा चेहराही ओळखता येत नव्हता. याच खोलीत साधना यांची १० वर्षांची मुलगीही रडत बसलेली होती. या लहानग्या मुलीसमोरच आरोपी मुलाने आईला गोळ्या घातल्या होत्या.
लखनौ – पबजी (PUBG) हा खेळ खेळण्यास मनाई केल्याने एका १६ वर्षांच्या मुलाने आपल्या आईची गोळी मारुन हत्या केल्याची (son killed mother)क्कादायक घटना उ. प्रदेशात उघडकीस आली आहे. इतकेच नाही तर त्याने तीन दिवस आईचा मृतदेह घरातच लपवून (three days dead body in home)ठेवला. हत्येनंतर ती रात्र १० वर्षांच्या आपल्या बहिणीसह त्याने घरातच घालवली. दुसऱ्या दिवशी, रविवारी आपल्या १० वर्षांच्या लहान बहिणीला घरात बंद करुन आरोपी दोस्ताच्या घरी गेला. त्यानंतर त्या मित्राला आरोपी घरी घेऊन आला. ऑनलाईन ऑर्डर करुन जेवण मागवले. त्यानंतर रात्री आरोपीने मित्रासोबत लॅपटॉपवर सिनेमाही पहिला.
मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून घरात रुम फ्रेशनर मारला
मित्राच्या आईने जेव्ह आरोपीला आईबाबत विचारले, तेव्हा आजीची तब्येत बरी नसल्याने ती आजीकडे गेल्याचे खोटे कारण या निर्ढावलेल्या आरोपीने दिले. हत्या झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याने दुसऱ्या एका मित्राला घरी राहायला बोलावले. या दोघांनी घरातच काही जेवण केले, अंडा करी बाहेरुन मागवली. तोपर्यंत आईचा मृतदेस सडू लागला होता. घरात त्याची दुर्गंधी पसरु लागली होती. मित्राला याचा वास येऊ नये म्हणून आरोपीने संपूर्म घरात फ्रेशनर मारला. मंगळवारी सकाळी मित्र घरी गेल्यानंतर आरोपी खेळायला बाहेर गेला. संध्याकाळपर्यंत आजूबाजूच्या घरापर्यंत दुर्गंधी पसरत चालली. त्या रात्री त्याने वडिलांना व्हिडिओ कॉल करुन घडलेला प्रकार सांगितला.
आरोपीचे मुलाचे वडील सैन्यदलात
मूळचे वाराणसीचे असलेले नवीन कुमार हे सैन्यदलात ज्युनिअर कमीशन्ड ऑफिसर आहेत. त्यांची पोस्टिंग सध्या प. बंगालमध्ये आहे. लखनौत यमुनापुरम कॉलनीत त्यांचे घर आहे. या घरात त्यांची पत्नी साधना, १६ वर्षांचा मुलगा आणि १० वर्षांची मुलगी राहात होती. मंगळवारी रात्री वडिलांना व्हिडिओ कॉल करुन त्याने वडिलांना आईची हत्या केल्याचे सांगितले. यावेळी कॉलवर त्याने आईचा मृतदेहही वडिलांना दाखवला. त्यानंतर नवीन यांनी आपल्या एका नातेवाईकाला फोन करुन तत्काळ घरी पाठवले. पोलीसही घटनास्थळी पोहचले तेव्हा घरातील वातावरण पाहून तेही आश्चर्यचकित झाले.
मोबाईलवर गेम खेळण्यापासून रोखले म्हणून केली हत्या
या मुलाला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. मात्र आई साधना गम खेळण्यापासून त्याला रोखत असे. शनिवारी रात्रीही आईने मुलाला गेम खेळण्यापासून रोखले. त्यामुळे मुलगा चांगलाच नाराज झाला. रात्री २ वाजता जेव्हा आई गाढ झोपेत होती, तेव्हा त्याने कपाटातून वडिलांचे पिस्तूल काढले आणि आईची हत्या केली. त्यानंतर १० वर्षांच्या बहिणीला धमकी देत तिलाही एका खोलीत त्याने बंद करुन ठेवले.
भावाच्या भीतीने आईच्या मृतदेहासोबत होती लहानगी
पोलिसांनी मंगळवारी रात्री जेव्हा बाहेरचा दरवाजा उघडला तेव्हा घरात प्रचंड दुर्गंधी येत होती. पोलीस नाकावर रुमाल लावून घरात पोहचले. खोलीत साधना यांचा मृतदेह पडलेला होता. त्यांचा मृतदेह इतका सडलेला होता की त्यांचा चेहराही ओळखता येत नव्हता. याच खोलीत साधना यांची १० वर्षांची मुलगीही रडत बसलेली होती. या लहानग्या मुलीसमोरच आरोपी मुलाने आईला गोळ्या घातल्या होत्या. त्यामुळे बहीण दहशतीत होती, भावाच्या सांगण्यावरुन ती आईच्या मृतदेहासोबत राहत होती.
मृतदेहाजवळ सापडले पिस्तूल, पूर्ण मॅगझिन होते रिकामे
पोलिसांना साधनाच्या मृतदेहाजवळ पिस्तूलही सापडले आहे. पिस्तुलाचे पूर्ण मॅगझिन रिकामे होते. पोलिसांचा अंदाज आहे की मुलाने सहाच्या सहा गोळ्या आईवर झाडल्या. मृतदेह सडल्यामुळे शरिरावरील गोळ्यांचा खुणा दिसत नव्हत्या. पोलिसांनी मुलाच्या केलेल्या चौकशीत, किती गोळ्या मारल्या हे त्या मुलाने सांगितलेले नाही. त्यानंर पोलीस आता पोस्टमार्टेम रिपोर्टची वाट पाहात आहेत. सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयतन्ही या मुलाने केला. इलेक्ट्रिकचे काम करण्यासाठी आलेल्याने आईची हत्या केल्याचे त्याने सुरुवातीला सांगितले. नंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने खून केल्याचे स्वीकारले.