AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संसद परिसरात सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात शाब्दिक चकमक, सोनिया गांधी म्हणाल्या, डोन्ट टॉक टू मी, धमकावल्याचा स्मृतींचा आरोप

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. यावेळी सोनिया गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात शाब्दीक बाचाबाचीही झाली. त्यावेळी स्मृती इराणींना 'Don't talk to me' अशा शब्दात त्यांना सुनावण्यातही आले.

संसद परिसरात सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात शाब्दिक चकमक, सोनिया गांधी म्हणाल्या, डोन्ट टॉक टू मी, धमकावल्याचा स्मृतींचा आरोप
| Updated on: Jul 28, 2022 | 3:12 PM
Share

नवी दिल्लीः काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी (Congress MP Adhir Ranjan Chaudhary) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्यावर टीका टिप्पणी केल्याप्रकरणी संसदेत आज प्रचंड गदारोळ झाला. या प्रकरणावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांनी काँग्रेसवर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला. यादरम्यान काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात जोरदार बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले. त्यापुढे जाऊन ज्यावेळी स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर आणि सोनिया गांधींवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला त्यावेळी ‘Don’t talk to me’ अशा शब्दात स्मृती इराणींना सुनावण्यात आले.

अधीर रंजन चौधरींचे वादग्रस्त वक्तव्य

अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपत्नी हा शब्द उच्चारल्याबद्दल भाजपकडून काँग्रेस आणि अधीर रंजन चौधरी यांच्यावर निशाना साधला. संसदेत प्रचंड गदारोध माजल्यानंतर मात्र अधीर रंजन चौधरी यांनी आपली चूक झाल्याचे त्यांनी मान्य केले. अधीर रंजन चौधरी यांनी चुक कबूल केल्यानंतरही भाजपकडून विनाकारण हा मुद्दा ताणून धरला असल्याचे मत काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आले.

काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

अधीर रंजन चौधरी यांच्या या वक्तव्यावरुन मात्र स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत, काँग्रेस आदिवासी, गरीब आणि महिलांच्या विरोधात असल्याची टीका केली. यावेळी इराणी यानी काँग्रेसवर निशाना साधत त्या म्हणाल्या की, देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या आदिवासी आणि गरीब कुटुंबातील महिलेच्या पदाचा अनादर करून राज्यघटनेला धक्का पोहोचवण्याचे काम सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील असलेल्या काँग्रेसने केले असल्याची टीकाही करण्यात आली.

घोषणाबाजीनंतर सोनिया गांधी पुन्हा परतल्या

स्मृती इराणी यांनी टीका केल्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यानंतर मात्र सभागृह तहकूब करण्यात आले. त्यावेळी सोनिया गांधी सभागृहाबाहेर जात असताना भाजप खासदारांकडून सोनिया गांधींच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. घोषणाबाजीनंतर सोनिया गांधी यांनी रमादेवीकडे यांच्याकडे जात त्यांना अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सोनिया गांधी यांनी माझे नाव का घेतले जात आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला तेव्हा तिथे स्मृती इराणी येऊन मैं आपकी क्या मदद कर सकती हूं, मैं आपका नाम लिया है.’ असं म्हणताच सोनिया गांधी यांनी कडक शब्दात don’t talk to me. अशा शब्दात स्मृती इराणींना सुनावण्यात आले. त्यानंतर स्मृती आणि सोनिया गांधी यांच्यात जोरदार वादावादी झाल्याचेही सांगण्यात आले. ही वादावादी 2 ते 3 मिनिटे चालू होती. यानंतर दोन्ही पक्षातील खासदारांनी येऊन सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांना वेगवेगळ्या दिशेन घेऊन गेले.

काँग्रेसचे स्पष्टीकरण…

काँग्रेस खासदार गीता कोडा यांनी सांगितले की, सभागृहाचे कामकाज दुपारी 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आल्यानंतर आपण सदनाबाहेर जात असताना भाजपकडून जोरदार आरडाओरड करण्यात आला. त्यावेळी सोनिया गांधी यांच्या नावाच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी आपले नावाच्या का घोषणा देत आहेत त्याची माहिती घेण्यासाठी सोनिया गांधी ज्यावेळी सदनात पुन्हा आल्या आणि त्यांनी रमादेवीकडे यांच्याकडे जात अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितल्याचे सांगितले. त्यावेळी स्मृती इराणींनी सोनिया गांधींकडे बोट करत जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सोनिया गांधींच्या राजीनाम्याची मागणी करताना आमच्या हल्ला होतो की काय अशी भीती वाटली त्यामुळेच आम्ही सोनिया गांधींना सदनात बाहेर काढले असल्याचेही गीता कोडा यांनी सांगितले. याप्रकारावर काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी ट्विट करत सांगितले म्हटले आहे की, आज लोकसभेत केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी सर्व मर्यादा ओलांडून असभ्य आणि अपमानस्पद वर्तन केले आहे. मात्र यावर लोकसभा अध्यक्ष या गोष्टीचा निषेध करणार का की संसदेचे नियम फक्त विरोधकांसाठीच आहेत असा सवालही त्यांनी केला आहे.

सोनिया गांधींचे वक्तव्य धमकीवजाः निर्मला सीतारामन

निर्मला सीतारामन यांनी माध्यमांशी बोलतान सांगितल्या की आमच्या पक्षाच्या खासदार ज्यावेळी सोनिया गांधी यांच्याबरोबर बोलण्यासाठी गेल्या त्यावेळी त्यांनी आमच्या खासदार तुम्ही माझ्याबरोबर बोलू नका असं धमकीवजा त्या बोलल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. तुम्ही देशाची दिशाभूल करत आहात. तुम्ही इतर सदस्यांना धमकावत आहात. राष्ट्रपतींविरुद्ध अशी टिप्पणी केल्याबद्दल तुम्ही माफी मागत नाही. मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी देशासमोर येऊन या सर्व प्रकाराबद्दल माफी मागावी असंही त्यांनी यावेळी सांगितले.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.