पिळदार मिशा राखणाऱ्या पोलिसांना मिळतो स्वतंत्र भत्ता, कोणत्या राज्यात आहे हा नियम…
देशातील पोलीस कर्मचारी वर्दीत असताना दाढी राखू शकत नाहीत. मात्र, काही राज्यांमध्ये तेथील पोलिसांना खास भरधार मिशीसाठी खास बोनस मिळतो. कोणते आहे हे राज्य पाहूयात...
भरधार मिशा असणाऱ्यांचा रुबाब काही औरच असतो. अनेकजण मिशांना पिळ देताना आढळतात. परंतू पोलिस खात्याचे काही नियम असतात. पोलिसांना वर्दीत असताना दाढी राखण्यास मनाई आहे. शिखांना वगळून कोणाला वर्दीत दाढी राखता येत नाही. तो पोलिस खात्याचा नियमच आहे. मात्र असेही असताना देखील काही राज्यात मात्र पोलिसांना मिशा राखल्यास खास बोनस म्हणून भत्ता वगैरे दिला जात आहे. कोणते आहे हे राज्य पाहूयात….
देशात दाढी आणि मिशांबाबत पोलिस दलात कठोर नियम आहेत. भारतीय पोलिस सेवा युनिफॉर्म नियम १९५४ अनुसार पोलिस अधिकारी वर्दीत असताना दाढी राखू शकत नाहीत. परंतू काही राज्यात पोलिसांना भरदार मिशा राखल्याबद्दल खास भत्ता मिळत असतो.
भारतीय पोलिस सेवा युनिफॉर्म रुल्सच्यानुसार पोलिस कर्मचारी केवळ योग्य प्रकारे नीट कटींग केलली मिशी बाळगू शकतात. या नियमात मिशा झुकलेल्या किंवा खाली लटकलेल्या नसाव्यात असा नियम आहे. मिशा राखताना या काही नियमांचे पालन पोलिस अधिकाऱ्याला करावे लागते. तर पाहूयात कोणत्या राज्यात पोलिसांना मिशा राखल्यास खास बोनस दिला जातो.
या राज्यात मिशा राखल्यास मिळतो भत्ता
देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील पोलिस कर्मचाऱ्याना मोठ्या मिशा राखल्यास २५० रुपायांचा भत्ता दिला जातो. या मागे विचार आणि परंपरांना पुनर्जिवीत राखण्याचा प्रयत्न मानला जातो. असे म्हटले जाते की परंपरा इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली आहे. मिशा राखणे हे शक्ती, सम्मान आणि अधिकार यांचे प्रतिक मानले जात होते. मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यात देखील पोलिसांना मिशा राखल्यास दर महिन्याला ३३ रुपयांचा भत्ता दिला जातो. या शिवाय बिहार येथे देखील तत्कालिन डीआयजी मनु महाराज यांनी त्यांच्या एका एएसआयला त्याने मिशा राखल्याने खास इनाम दिले होते.
मिशांबाबत आहेत विविध नियम
देशात वेगवेगळ्या राज्यात दाढी आणि मिशांबाबत वेगवेगळे नियम आहेत. काही राज्यात सक्षम प्राधिकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मंजूरीने धार्मिक कारणासाठी दाढी राखण्याची परवानगी दिली जाते. तर काही ठिकाणी यास पूर्णपणे बंदी आहे. देशात शीख पोलिस कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही वर्दीत असताना दाढी राखण्याची परवानगी दिली जात नाही. जर कोणा अन्य धर्माच्या कर्मचारी धार्मिक कारणाने दाढी राखू इच्छीत असेल तर त्याला परवानगी घ्यावी लागते. पोलिसांसह लष्करात देखील दाढी – मिशासंदर्भात कठोर नियम तयार केलेले आहेत. लष्करात देखील सैनिकाला दाढी राखण्यास परवानगी नाही.