दिल्लीत मद्यावर 70 टक्के ‘स्पेशल कोरोना फी’, पेट्रोल-डिझेलचीही घसघशीत दरवाढ, केजरीवालांची घोषणा
दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 1.67 रुपयांनी, तर डिझेल तब्बल 7.10 रुपयांनी महाग झालं आहे. (Special Corona Fee on Liquor Petrol Diesel Price hike in Delhi)
नवी दिल्ली : ‘आम आदमी पक्षा’च्या नेतृत्वातील दिल्ली सरकारने मद्य आणि इंधनाच्या दरात घसघशीत वाढ केली आहे. दारुच्या किरकोळ दरावर 70 टक्के ‘स्पेशल कोरोना फी’ आकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांनी गर्दी केल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारपासून दिल्लीत उपकर लागू करण्याचा निर्णय घेतला. तर पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर ‘व्हॅट’ वाढवल्याने इंधनाचीही दरवाढ झाली आहे. (Special Corona Fee on Liquor Petrol Diesel Price hike in Delhi)
दिल्ली सरकारच्या आदेशानुसार, परवानाधारक मद्य विक्रेत्यांनी सर्व प्रकारच्या मद्यावर एमआरपीच्या 70% उपकर आकारायचा आहे. त्यामुळे राजधानीत दारुच्या किमतीत घसघशीत वाढ झाली आहे. आदल्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांनी दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. नियमांचं पालन होत नसल्यास दुकानमालक जबाबदार असतील, असंही केजरीवालांनी स्पष्ट केलं होतं.
दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही केजरीवालांकडून वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर 1.67 रुपयांनी, तर डिझेल तब्बल 7.10 रुपयांनी महाग झालं आहे.
हेही वाचा : कर्नाटकचा कोटा फुल्ल, एकाच दिवसात दारुची विक्रमी विक्री
केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊनच्या नियमात अंशतः शिथिलता आणत एकल दुकानांमध्ये मद्यविक्रीला परवानगी दिली. ‘रेड झोन’मधील मद्यविक्रीच्या दुकानांना सशर्त मुभा देण्याचं जाहीर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. ग्राहकांनी नियम पायदळी तुडवत दारुच्या दुकानांबाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. (Special Corona Fee on Liquor Petrol Diesel Price hike in Delhi)
मद्यप्रेमींच्या लांबलचक रांगांमुळे पोलिसांवर दिल्लीत काही ठिकाणी दारुची दुकाने बंद करण्याची वेळ आली. कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशात लॉकडाऊन असल्याने दिल्लीसह भारतात 45 दिवसाहून अधिक काळ ‘लिकर स्टोअर्स’ बंद आहेत.
हेही वाचा : तळीरामांचा बांध फुटला, एकमेकांना चिकटून रांगा, दारुच्या मज्जेसाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
उत्पादन शुल्क हे राज्य सरकारच्या अखत्यारित येते. मद्यावरील कर (उत्पादन शुल्क) हा राज्यांच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक मानला जातो. बिघडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हा कर हातभार लावू शकतो, असं बोललं जातं.
दिल्लीत, समजा दारुची किंमत 100 रुपये असेल, तर ग्राहकांना 170 रुपये मोजावे लागणार आहेत. दिल्लीपाठोपाठ शेजारील राज्य हरियाणाही दारुवर विशेष उपकर आकारण्याचा विचारात आहे.
#WATCH People line up outside a liquor shop in Delhi’s Laxmi Nagar. Delhi Government has imposed a “Special Corona Fee” of 70% tax on Maximum Retail Price of the liquor. pic.twitter.com/rRnk1cuPCr
— ANI (@ANI) May 5, 2020
(Special Corona Fee on Liquor Petrol Diesel Price hike in Delhi)