AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षणाची दुर्दशा, दहावीत आले पण दुसरीचे मातृभाषेचे पुस्तक वाचता येईना

Education: पालक मुला, मुलींना शाळेत पाठवत आहेत. यामुळे मुले, मुली शाळेत जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु शाळेत जाऊन मुले करता काय? असा प्रश्न निर्माण करणारा अहवाल आला आहे. या अहवालातील निष्कर्षामुळे देशातील शिक्षणाची दुर्दशा समोर आली आहे.

शिक्षणाची दुर्दशा, दहावीत आले पण दुसरीचे मातृभाषेचे पुस्तक वाचता येईना
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 9:55 AM

नवी दिल्ली, दि.18 जानेवारी 2024 | देशात प्राथमिक शिक्षणासाठी शिक्षण हक्क कायदा करण्यात आला आहे. ६ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यात येत आहे. मुले, मुली शाळेत जाण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु शाळेत जाऊन मुले करता काय? असा प्रश्न निर्माण करणारा अहवाल आला आहे. दहावीच्या मुलांना दुसरेचे मातृभाषेतील पुस्तक वाचता येत नाही. ॲन्युअल स्टेट्स ऑफ एज्युकेशन रिपोर्ट म्हणजेच असर या संस्थेकडून देशातील १४ ते १८ या वयोगटातील मुलांची पाहणी करण्यात आली. त्या पाहणीतील निष्कर्ष शिक्षण क्षेत्रातील विदारक परिस्थिती मांडणारे आहे. देशातील सुमारे २५ टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतील दुसरीचे पुस्तकही योग्य पद्धतीने वाचता येत नाही.

कसे करण्यात आले सर्वेक्षण

देशातील २६ राज्यांमधील २८ जिल्ह्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले. १४ ते १८ वयोगटातील मुलांची निवडण सर्वेक्षणासाठी करण्यात आली. एकूण ३४ हजार ७४५ विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न विचारण्यात आले. देशातील प्रत्येक राज्यांमधील एका ग्रामीण जिल्ह्याचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये १४ ते १८ वयोगटातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मुलांना एक ते तीन अंकापर्यंतची आकडेमोडी करता आले नाही. ५७.३ टक्के मुलांनी इंग्रजीतील वाक्ये वाचली. परंतु त्याचा अर्थ तीन चतुर्थांश मुले सांगू शकली नाही.

मुलांच्या तुलनेत मातृभाषेत मुली हुशार

मुलांच्या तुलनेत मुली चांगले वाचताना दिसून आल्या. मुलींनी मातृभाषेतील दुसरीचा धडा चांगला वाचला. परंतु गणित आणि इंग्रजीमध्ये मुले अधिक चांगली कामगिरी केली. १४ वर्ष वयाची ३.९ टक्के मुले शिक्षण घेत नाही. परंतु हे प्रमाण अठरा वर्षापर्यंत वाढून ३२.६ टक्के झाले. म्हणजे शिक्षणात गळतीचे प्रमाण वाढले आहे. जवळपास सर्वच मुलांच्या घरी स्मार्टफोन आहे. परंतु त्यातील ८० टक्के मुले केवळ मनोरंजनासाठी स्मार्टफोन वापरत असल्याचे दिसून आले.

हे सुद्धा वाचा

ही सकारात्मक बाब

सहा ते १४ या वयोगटातील मुलांच्या शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे. २०१० मध्ये ९६.६ मुले शाळेत आले होते. ते २०२२ मध्ये ९८.४ टक्क्ये झाले आहे. विज्ञान, इंजिनिअरिंग, मॅथेमॅटिक्स या शाखांमध्ये प्रवेश घेण्याचे मुले मुलींपेक्षा आघाडीवर आहे.

'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.