अद्वितीय तरूणी… 16 सरकारी नोकऱ्या सोडल्या, कारण ऐकून सॅल्युट कराल
UPSC Success Story 2024 : ज्या उमेदवारांना देशाची सेवा करण्याची इच्छा असते, ते आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. ही पदे मिळवण्यासाठी उमेदवार उच्च पगाराच्या नोकऱ्याही सोडतात. आज आपण अशाच एका IPS अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी 16 सरकारी नोकऱ्या नाकारल्या होत्या. तिच्याबद्दल जाणून घेऊया.
UPSC Success Story 2024 : ज्या उमेदवारांना देशाची सेवा करण्याची इच्छा असते, ते आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. ही पदे मिळवण्यासाठी उमेदवार उच्च पगाराच्या नोकऱ्याही सोडतात. आज आपण अशाच एका IPS अधिकाऱ्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी 16 सरकारी नोकऱ्या नाकारल्या होत्या. उत्तराखंडमधील अल्मोडा येथील रहिवासी असलेल्या तृप्ती भट्ट सध्या यशस्वी आयपीएस अधिकारी आहेत.
त्या अशा कुटुंबात वाढल्या जिथे बहुतेक सदस्य शिक्षक होते. चार भावंडांमध्ये तृप्ती सर्वात मोठ्या आहेत. त्यांनी बेर्शेबा शाळेतून शालेय शिक्षण घेतले आणि बारावीच्या अभ्यासासाठी केंद्रीय विद्यालयात प्रवेश घेतला. बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पंतनगर विद्यापीठातून बीटेकची पदवी घेतली. ग्रॅज्युएशन झाल्यानतर तृप्ती यांनी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम केले. जेव्हा त्या 9वीत होत्या तेव्हा त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळी तृप्ती भट्ट यांना त्यांच्याकडून हस्तलिखित पत्र देण्यात मिळाले. त्यामुळे त्यांना खूप प्रेरणा मिळाली.
UPSC परीक्षेत यश मिळवण्यापूर्वीत्यांनी 16 सरकारी नोकरीच्या ऑफर नाकारल्या होत्या. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कडून नोकरीची ऑफर देखील मिळाली होती.
पहिल्या प्रयत्नातच पास झाली UPSC परीक्षा
तृप्ती भट्ट या पहिल्यापासूनच अभ्यासात प्रचंड हुशार होत्या. यूपीएससी परीक्षेसाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास केला. UPSC CSE 2013 मध्ये पहिल्याच प्रयत्नात 165 वा क्रमांक मिळवला आणि त्यांची IPS पदासाठी निवड झाली होती. त्यांना त्यांच्या पदासाठी त्यांचे होम कॅडर देण्यात आले. जिथे त्यांना डेहराडूनमध्ये पोलिस अधीक्षक (एसपी) पद मिळाले. त्यानंतर, त्यांनी चमोलीत एसपी म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर टिहरी गढवालमध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) कमांडर म्हणून काम सांभाळले. सध्या त्या डेहराडून एसपी इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी पदावर तैनात आहेत.