AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : 4 किलो सोनं आणि लखलखते हिरे.. प्रभू श्रीरामासाठी अनमोल मुकुट भेट देणारी ‘ती’ व्यक्ती कोण ? किंमत ऐकाल तर..

संपूर्ण देशाच्या आणि अयोध्येसाठी 22 जानेवारीचा दिवस ऐतिहासिक ठरला. रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीरामाची औपचारिकरित्या स्थापना करण्यात आली. सुरत येथील एका हिरे व्यावसायिकाने अयोध्येतील रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भगवान श्रीरामाच्या मंदिरासाठी सोनं-लखलखत्या हिऱ्यांचा मुकुट दान केला आहे.

Ram Mandir : 4 किलो सोनं आणि लखलखते हिरे.. प्रभू श्रीरामासाठी अनमोल मुकुट भेट देणारी  'ती' व्यक्ती कोण ? किंमत ऐकाल तर..
| Updated on: Jan 23, 2024 | 11:30 AM
Share

अयोध्या | 23 जानेवारी 2024 : संपूर्ण देशाच्या आणि अयोध्येसाठी 22 जानेवारीचा दिवस ऐतिहासिक ठरला. रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीरामाची औपचारिकरित्या स्थापना करण्यात आली आहे. सोमवार, 22 जानेवारीला हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या याच्या हस्ते झाला. त्यावेळी देशातील अनेक मान्यवर, उद्योगपती, सेलिब्रिटीही उपस्थित होते. सर्वांनी श्रीरामाच्या नावाचा जयघोष करत आनंद व्यक्त केला. त्याचवेळी गुजरातमधील, सुरत येथील एका हिरे व्यावसायिकाने अयोध्येतील रामजन्मभूमीवर बांधण्यात आलेल्या भगवान श्रीरामाच्या मंदिरासाठी 11 कोटी रुपयांचा मुकुट दान केला आहे. हा हिरे व्यावसायिक आपल्या कुटुंबासह अयोध्या राम मंदिरात मुकुट दान करण्यासाठी पोहोचला होता.

खरंतर, सुरतमधील हिरे व्यापारी मुकेश पटेल यांनी त्यांच्या ग्रीन लॅब डायमंड कंपनीमध्ये प्रभू रामासाठी सोनं, हिरे आणि नीलमांनी जडलेला 6 किलो वजनाचा मुकुट तयार केला होता. तब्बल 11 कोटी रुपये किंमत असलेला हा मुकुट त्यांनी भक्तीभावाने प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण केला.

रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला अर्पण केला मुकूट

हा मुकूट भेट देण्यासाठी हिरे उद्योगपती मुकेश पटेल अभिषेक सोहळ्याच्या एक दिवस आधीच कुटुंबियांसह अयोध्येला पोहोचले. त्यानंतर 22 जानेवारी रोजी प्रभू रामसाठी तयार केलेला सोन्याचा- हिऱ्याचा हा मुकूट श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला अर्पण करण्यात आला.

विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय खजिनदार दिनेश भाई यांनी सांगितले की, ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक मुकेश भाई पटेल यांनी अयोध्येच्या जगप्रसिद्ध नव्याने बांधलेल्या मंदिरात विराजमान होणार्‍या भगवान श्रीरामाला काही दागिने अर्पण करण्याचा विचार केला होता. कुटुंबातील सदस्य आणि कंपनीतील अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर, त्यांनी सोन्याने आणि इतर दागिन्यांनी जडलेला मुकूट श्रीरामचरणी अर्पण करण्याचा निर्णय घेतला.

4 किलो सोनं, मोठमोठे हिरे आणि.. मुकटावर काय-काय ?

त्यानंतर प्रभू रामाच्या मूर्तीच्या मुकुटासाठी माप घेण्यासाठी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना अयोध्येला पाठवण्यात आले होते. काटेकोरपणे मोजमाप घेऊन कंपनीचे कर्मचारी सुरतला आले. यानंतर मुकुट बनवण्याचे काम सुरू करण्यात आले. 6 किलो वजनाच्या या मुकुटात 4 किलो सोने वापरण्यात आले आहे. त्यानंतर हिरे, माणिक, मोती, नीलम अशा लहान-मोठ्या आकारांची रत्ने जडवण्यात आली. हे सर्व साहित्य वापरल्यानंतर अयोध्येतील जगप्रसिद्ध नवनिर्मित मंदिरात विराजमान प्रभू रामचंद्रांच्या मस्तकासाठी हा मुकूट भेट देण्यात आला. व्यापारी मुकेश पटेल यांनी अयोध्या रामजन्मभूमी ट्रस्टचे मंत्री चंपत राय जी, विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक जी, महासचिव मिलन जी आणि दिनेश नावडिया यांच्या उपस्थितीत 11 कोटी रुपयांचा मुकुट अर्पण केला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.