‘माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळाला नाही’, सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची खदखद

माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळालेला नाही", अशी खदखद सुभाजचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी व्यक्त केली (Subhash chandra Bose daughter Anita Bose)

'माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळाला नाही', सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची खदखद
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 9:13 PM

कोलकाता : “पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानासाठी कोलकाताला आले, या गोष्टीचा मला आनंद होत आहे. मात्र, तरीही माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळालेला नाही”, अशी खदखद सुभाजचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी व्यक्त केली. त्यांनी ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबतच भाष्य केलं आहे. त्याचबरोबर भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये सुभाजचंद्र बोस यांच्या सन्मानासाठी जी स्पर्धा रंगली आहे ही चांगली गोष्ट असल्याचं अनिता बोस म्हणाल्या (Subhash chandra Bose daughter Anita Bose).

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त कोलकाता येथे व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांच्याकडूनही नेताजी सुभाजचंद्र बोस यांच्या जयंती निमित्ताने लाँगमार्च काढण्यात आला होता. या निमित्ताने सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस आनंदी आहेत. मात्र, तरीदेखील सुभाषचंद्र बोस यांना हवा तसा सन्मान मिळाला नाही, अशी खदखद अनिता बोस यांनी व्यक्त केली.

“इतक्या वर्षांनंतरही माझ्या वडिलांचा सन्मान केला जातो, ही चांगली गोष्ट आहे. नेताजींनी आपल्या देशासाठी भरपूर काही केलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत बरेच कागदपत्रे मिळाले नव्हते. काही वर्षांनी ते मिळाले तेव्हा त्यांच्या INA ने स्वातंत्र्य लढ्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावल्याची माहिती समोर आली”, असं अनिता बोस म्हणाल्या.

“पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नेताजींच्या प्रशंसक आहेत. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील नेताजींचे प्रशंसक आहेत. काही पातळीवर या सगळ्या गोष्टी ठीक आहेत पण विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या सगळ्या घडामोडी घडणं योग्य नाही”, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

“दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन नेताजींचा सन्मान करायला हवा. नेताजींना सन्मान देण्यासाठी आता दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा रंगली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे”, असंदेखील अनिता बॉस म्हणाल्या (Subhash chandra Bose daughter Anita Bose).

संबंधित बातम्या :

दिल्लीतच देशाची राजधानी का?, कोलकातासहीत देशातील चार ठिकाणी राजधानी बनवा: ममता बॅनर्जी

जेव्हा मोदी समक्ष ममता दीदीने ‘जय श्रीराम’चे नारे देणाऱ्यांना सुनावलं!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.