महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सीबीआयचे डायरेक्टर होणार?; सरन्यायाधीशांच्या भूमिकेनं दोन नावं बाद!
महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल हे सीबीआयचे डायरेक्टर होण्याची शक्यता वाढली आहे. (Subodh Kumar Jaiswal will be new CBI chief?)
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल हे सीबीआयचे डायरेक्टर होण्याची शक्यता वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी सीबीआय संचालकाच्या स्पर्धेतील दोन नावांवर फुली मारली आहे. त्यामुळे या पदावर जायस्वाल यांची वर्णी लागण्याची शक्यता अधिक वाढली आहे. (Subodh Kumar Jaiswal will be new CBI chief?)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासोबत बैठक घेतली. सीबीआयच्या संचालक निवडीसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. तब्बल 90 मिनिटे ही मिटिंग चालली. यावेळी रमन्ना यांनी एका महत्त्वाच्या नियमाचा हवाला देऊन या स्पर्धेतील दोन नावांवर फुली मारली.
म्हणून दोन नावे बाद
रमन्ना यांनी 6 मंथ नियमाचा यावेळी हवाला दिला. सीबीआयच्या नव्या संचालकाच्या नियुक्तीमध्ये सहा महिन्याच्या नियमांचं पालन झालं पाहिजे. ज्या अधिकाऱ्यांच्या निवृत्तीला केवळ सहा महिने बाकी आहेत, त्यांचाच या पोस्टसाठी विचार केला जावा, असं नियम सांगतो, असं रमन्ना यांनी सांगितलं. सरन्यायाधीशांच्या या वक्तव्याचं अधीर रंजन यांनी समर्थन केलं. तीन सदस्यांच्या पॅनलमधील दोन सदस्यांनी या नियमाची बाजू घेतली. त्यामुळे सीबीआय संचालकपदाच्या स्पर्धेतील दोन नावे बाद झाली.
अस्थाना, मोदी स्पर्धेतून बाद
बीएसएफचे प्रमुख राकेश अस्थाना हे 31 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. तसेच येत्या 31 मे रोजी एनआयएचे प्रमुख वाय. सी. मोदी निवृत्त होत आहेत. या दोघांचीही नावे या स्पर्धेत सर्वाधिक पसंतीची होती. मात्र, सरन्यायाधीशांनी नियम दाखविल्याने या दोन्ही अधिकाऱ्यांची नावे स्पर्धेतून बाद झाली आहेत.
तीन नावांमध्ये जोरदार चुरस
आता या पदाच्या स्पर्धेत अवघे तीन नावे उरली आहेत. राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, सशस्त्र सीमा दलाचे संचालक केआर चंद्र आणि गृहमंत्रालयाचे विशेष सचिव व्ही.एस. के. कौमुदी या तिघांमध्ये या पदासाठी स्पर्धा आहे. या तिघांमध्येही सुबोध कुमार यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. इतर दोन अधिकाऱ्यांपेक्षा सुबोध कुमार हे सीनियर आहेत. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
चार महिन्यापूर्वीच मिटींग होणार होती
मोदी, चौधरी आणि सरन्यायाधीशांमध्ये सीबीआयच्या संचालकाच्या निवडीसाठी चार महिन्यांपूर्वीच बैठक होणार होती. मात्र, काही कारणास्तव ही मिटिंग होऊ शकली नाही. अधीर रंजन चौधरी यांनी सीबीआय संचालकपदाच्या चर्चेतील कोणत्याही नावावर आक्षेप घेतला नाही. मात्र, सरकारचं वागणं बेफिकीरीचं असल्याची टीका चौधरी यांनी केली. या पदासाठी मला 11 मे रोजी 109 लोकांच्या नावाची यादी मिळाली होती. सोमवारी 1 वाजता नवी यादी मिळाली. त्यात केवळ दहा नावे होती. त्यानंतर 4 वाजता केवळ सहा नावांची यादी मिळाली. पर्सनल अँड ट्रेनिंग विभागाची ही भूमिका अत्यंत बेफिकीरीची आहे, असं चौधरी म्हणाले.
निवड कशी होते?
सीबीआयच्या संचालकाची पोस्ट फेब्रुवारीपासून रिक्त आहे. ऋषी कुमार शुक्ल हे फेब्रुवारीपर्यंत संचालक म्हणून काम पाहत होते. त्यानंतर प्रवीण सिन्हा यांच्याकडे या विभागाचा प्रभारी चार्ज दिला. या पोस्टसाठी 1984 ते 1987 च्या बॅचच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार केला जातो. सेवा जेष्ठता, प्रामाणिकपणा, भ्रष्टाचाराच्या केसेस हाताळण्याचा अनुभव आदी गोष्टी पाहून निवड समिती सीबीआयच्या संचालकाची निवड करते. (Subodh Kumar Jaiswal will be new CBI chief?)
VIDEO :SuperFast 100 News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 25 May 2021https://t.co/7JLqlK1AXc
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 25, 2021
संबंधित बातम्या:
CDS Final Result 2020: यूपीएससीकडून सीडीएस परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, 147 उमेदवारांची निवड