AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thomas Kurian Success story : IIT ड्रापआउट थॉमस कुरियन कसे झाले 12,100 कोटींचे मालक?, सुंदर पिचाई यांच्यापेक्षा दुप्पट संपत्ती

२०२२ मध्ये थॉमस कुरियन यांची संपत्ती १२ हजार १०० कोटी रुपये होती. गुगलच्या विद्यमान सीईओंची संपत्ती ५ हजार ३०० कोटी होती. याचा अर्थ थॉमस कुरियन यांची संपत्ती सुंदर पिचाई यांच्यापेक्षा दुप्पट आहे.

Thomas Kurian Success story : IIT ड्रापआउट थॉमस कुरियन कसे झाले 12,100 कोटींचे मालक?, सुंदर पिचाई यांच्यापेक्षा दुप्पट संपत्ती
| Updated on: Jun 20, 2023 | 11:15 PM
Share

नवी दिल्ली : गुगलमध्ये  कित्तेक भारतीय महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत. त्यापैकी एक आहेत केरळमध्ये जन्म झालेले थॉमस कुरियन. २०१८ मध्ये त्यांनी गुगल क्लाऊडच्या सीईओची जबाबदारी घेतली. आता थॉमस कुरियन हे भारतातील दुसरे श्रीमंत सीईओ आहेत. थॉमस हे आयआयटी ड्रापआऊट आहेत. हुरन इंडियाच्या यादीनुसार, २०२२ मध्ये थॉमस कुरियन यांची संपत्ती १२ हजार १०० कोटी रुपये होती. गुगलच्या विद्यमान सीईओंची संपत्ती ५ हजार ३०० कोटी होती. याचा अर्थ थॉमस कुरियन यांची संपत्ती सुंदर पिचाई यांच्यापेक्षा दुप्पट आहे.

थॉमस यांचे वडील केमिकल इंजीनीअर होते. थॉमस यांनी सेंट जोसेफ बॉईज हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यांचे भाऊ जॉर्ज कुरियन आहेत की, जे २०१५ पासून नेटअॅपचे सीइओ म्हणून काम करत आहेत. दोघेही भाऊ लहानपणापासून अभ्यासात हुशार होते. दोन्ही भाऊ आयआयटी मद्रासला गेले. पण, थॉमस कुरियन यांनी आयआयटी मद्रास सोडण्याचा निर्णय घेतला.

स्कूल ऑफ बिझनेसमध्ये एमबीए

थॉमस यांचा प्रवेश अमेरिकेच्या प्रिंसटन विद्यापीठात झाला. १६ व्या वर्षी थॉमस हे पदवीसाठी अमेरिकेला पोहचले. इलेक्ट्रीकल इंजीनीअरिंगमध्ये त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर थॉमस यांनी स्कूल ऑफ बिझनेसमध्ये एमबीए केलं.

गुगल जॉईन केले

थॉमस यांना पहिली नोकरी मॅकिन्से कंपनीत मिळाली. तिथं सहा वर्षे काम केल्यानंतर १९९६ मध्ये ओरेकलला गेले. त्यांनी २२ वर्षे पर्यंत काम केलं. त्यानंतर त्यांनी लीडरशीपमध्ये प्रवेश केला. ओरेकलमध्ये ३२ देशांच्या ३५ हजार लोकांच्या टीमला लीड केले. २०१८ मध्ये त्यांचे ओरेकल कंपनीचे संस्थापक लॅरी एलीसनसोबत मतभेद झाले. कंपनीचा राजीनामा देऊन त्यांनी गुगल जॉईन केले.

जयश्री उल्लाल देशात श्रीमंत सीईओ

हुरन इंडियाच्या लिस्टनुसार, २०२२ मध्ये सर्वात श्रीमंत भारतीय सीइओंच्या लिस्टमध्ये अरिस्टा नेटवर्क्सच्या जयश्री उल्लाल होत्या. त्या थॉमस कुरियनपेक्षा श्रीमंत होत्या. थॉमस कुरियन कुटुंबीय खूप श्रीमंत आहेत. त्यांचे वडीलही श्रीमंत आहेत.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.