महागाईचा असाही निषेध; मित्राने नवरदेवाला लग्नात दिले चक्क लिंबाचे गिफ्ट

भारतात देखील महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. खाद्य तेलापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढले आहेत. राजकोटमधील एका लग्नात नवरदेवाला चक्क लिंबू गिफ्ट देऊन महागाईचा निषेध करण्यात आला आहे.

महागाईचा असाही निषेध; मित्राने नवरदेवाला लग्नात दिले चक्क लिंबाचे गिफ्ट
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 10:17 AM

राजकोट :  भारतात देखील महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर गगनाला भिडले आहेत. खाद्य तेलापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढले आहेत. देशात महागाई इतकी वाढली आहे की, दैनंदीन लागणाऱ्या गरजेच्या वस्तू विकत घेण्याचे प्रमाण देखील घटले आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिक परेशान असून, महागाईचा विविध पद्धतीने निषेध करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमधील एका लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी जोडप्याला लग्नाचे गिफ्ट म्हणून चक्क पेट्रोल आणि डिझेल भेट देत महागाईचा निषेध केला होता. त्यामुळे हे लग्न चांगलेच चर्चेत आले होते. सोशल मीडियावर या लग्नाची मोठी चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. पेट्रोल डिझेलनंतर आता गुजरातच्या राजकोटमध्ये झालेल्या एका लग्नात मित्रांनी नवरदेवाला चक्क लिंबू भेट दिली आहे. त्यामुळे या लग्नाची देखील सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.

नेमंक प्रकरण काय?

गुजरातच्या राजकोटमध्ये नुकतेच एक लग्न पार पडले. या लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी त्याला चक्क गिफ्ट म्हणून लिंबू भेट दिले आहे. त्यामुळे हे लग्न चर्चेत आले आहे. सामान्यपणे लग्नात जोडप्यांना महागडे गिफ्ट देण्याची प्रथा असते. अनेक जण आपआपल्या सोईनुसार गिफ्ट देतात. मात्र इथे नवरदेवाच्या मित्रांनी त्याला चक्क लिंबू गिफ्ट केले आहे. पेट्रोल, डिझेलचे दर तर वाढतच आहेत. मात्र आता भाजीपाल्याचे दर देखील वाढू लागले आहेत. सामान्य माणसाला जगने कठिण झाले आहे. लिंबाचे दर तर शेकडा हजार रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच किरकोळ बाजारात एक लिंबू दहा रुपयांना मिळत आहे. याचा निषेध म्हणून नवरदेवाच्या मित्रांनी त्याला लिंबाची भेट दिली.

महागाई वाढली

सध्या देशात महागाई गेल्या सतरा महिन्यातील सर्वोच्च स्थरावर आहे. दैनंदीन गरजेच्या वस्तू एफएमसीजीच्या मागणीमध्ये देखील मोठी घट झाली आहे. महागाईचा सर्वाधिक फटका हा दक्षिण भारताला बसला आहे. तामिळनाडून, आध्र प्रदेश आणि तेलंगनामध्ये एफएमसीजी वस्तू खरेदीचे प्रमाण सुमारे दहा टक्क्यांपेक्षा अधिक कमी झाले आहे. महाराष्ट्रात देखील हे प्रमाण नऊ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या महिना भरात इंधनाच्या दरात लिटर मागे दहा रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

संबंधित बातम्या

Sri Lanka financial crisis : श्रीलंकेचा पाय आणखी खोलात; शेअर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय

Petrol diesel price : कच्च्या तेलाचे दर वाढले ; इंधनाच्या दरात कोणतीही वाढ नाही, सलग बाराव्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर

पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार देणार नाही सवलत; आता राज्य सरकारांनी कमी करावा ‘व्हॅट’.. पेट्रोलियम मंत्र्यांनी केले स्पष्ट

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.