आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत देशात रिमोट वोटिंग सुरू होणार: निवडणूक आयुक्त

आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे 2024पर्यंत देशातील नागरिकांना रिमोट वोटिंगचा लाभ घेता येणार आहे. (Sunil Arora hopeful concept of remote voting will see the next LS polls)

आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत देशात रिमोट वोटिंग सुरू होणार: निवडणूक आयुक्त
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 8:02 AM

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे 2024पर्यंत देशातील नागरिकांना रिमोट वोटिंगचा लाभ घेता येणार आहे. लोकसभा निवडणुकीत रिमोट वोटिंग सुरू करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आयआयटी चेन्नईसहित देशातील विविध आयआयटी संस्था त्या दृष्टीने काम करत असल्यांच मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं. (Sunil Arora hopeful concept of remote voting will see the next LS polls)

देशात निष्पक्ष आणि विश्वासहार्य निवडणूक प्रणाली निर्माण करण्यासाठी रिमोट वोटिंगवर काम सुरू आहे. येत्या दोन तीन महिन्यात त्याचा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे. याच वर्षी चेन्नई आयआयटीसह देशातील प्रमुख आयआयटी संस्थांशी चर्चा करून रिमोट वोटिंगवर चर्चा करण्यात आली होती. त्यांनतर हा रिसर्च प्रकल्प सुरू करण्यात आला होता. दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

इंटरनेटद्वारे मतदान नाही

गेल्या काही महिन्यांपासून एक डेडिकेटेड टीम या प्रकल्पावर काम करत आहे. रिमोट वोटिंगचीही संकल्पना 2024च्या लोकसभआ निवडणुकीपर्यंत मूर्त रुप घेईल, अशी आम्हाला आशा आहे, असं सांगतानाच या प्रकल्पाचा अर्थ इंटरनेटद्वारे मतदान करणे नाही आणि घरून मतदान करण्याचाही नाही, असं त्यांनी सांगितलं.

मतदान प्रक्रियेत बदल होणार

या नव्या संकल्पनेमुळे मतदान प्रक्रियेत मोठे बदल होणार आहेत. स्वतंत्र, निष्पक्ष आणि विश्वसनीय मतदान प्रक्रिया होण्यासाठी आयोगाने मतदानात पारदर्शिता आणण्यावर आणि गोपनीयतेवर नेहमीच भर दिला आहे. त्यासाठीच आयोग वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा करत असतो. त्याचाच भाग म्हणून मतदानाच्या या नव्या मॉडलला आकार देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेत काही बदलही होणार आहेत. राजकीय पक्ष आणि अन्य पक्षांशी याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचंही अरोरा यांनी सांगितलं.

अनिवासी भारतीयांसाठी सुविधा

परदेशातील मतदारांना वन वे इलेक्ट्रॉनिक पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यावरही अरोरा यांनी भाष्य केलं. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आयोग याबाबत एक सेमिनार आयोजित करणार आहे. त्यात या सर्व गोष्टींवर चर्चा केली जाईल, असं ते म्हणाले. सध्या अनिवासी भारतीयांना त्यांच्या पासपोर्टवर ज्या मतदारसंघाचे नाव आहे, त्या ठिकाणी मतदान करण्याचा हक्क देण्यात आलेला आहे.

म्हणजे घर बसल्या मतदान नाही

या प्रकल्पातील ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीबाबत माहिती देताना माजी ज्येष्ठ उप निवडणूक आयुक्त संदीप सक्सेना यांनी रिमोट वोटिंग म्हणजे घर बसल्या मतदान नसल्याचं सांगितलं होतं. ही दुतर्फा इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टिम आहे. म्हणजे बायोमॅट्रीक हजेरी घेणे आणि वेब कॅमेऱ्याचा वापर करून मतदारांचा फोटो घेतल्यानंतर त्यांना मतदान करता येणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्यांना देण्यात आलेल्या वेळेत बुथवर यावे लागणार आहे. (Sunil Arora hopeful concept of remote voting will see the next LS polls)

संबंधित बातम्या:

राम माधव यांचा पोर्टफोलियो बदलला; भाजपमधून संघात वापसी

‘लग्नाआधी मुलगा-मुलीची रक्त-कुंडली जुळायला हवी’, केद्रीय आरोग्यमंत्री असं का म्हणाले?

दत्तात्रय होसबळे संघाचे नवे सरकार्यवाह; वाचा, कोण आहेत होसबळे?

(Sunil Arora hopeful concept of remote voting will see the next LS polls)

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.