‘या’ सरकारी बँकेला सुप्रीम कोर्टाचा दणका, मोठी कारवाई, तुमचंही अकाउंट आहे का?
मोठी बातमी समोर येत आहे, सुप्रीम कोर्टानं बँकेवर कारवाई केली असून, दंड भरण्याचा देखील आदेश दिला आहे.
मोठी बातमी समोर येत आहे. SBI बँकेला एका प्रकरणात सुप्रीम कोर्टानं चांगलीच समज दिली आहे, सोबत 94,000 रुपयांचा दंड भरण्याचा देखील आदेश दिला आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, सुप्रीम कोर्टानं एसबीआय बँकेला का फटकारले? बँकेला दड भरण्याचा का आदेश देण्यात आला? बँके विरोधात कोणी याचिका दाखल केली होती? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे नेमकं प्रकरण?
हे प्रकरण आसामच्या व्यक्तीशी संबंधित आहे, 2021 मध्ये या व्यक्तीनं लुइस फिलिप ब्लेजर खरेदी केलं होतं.मात्र त्याला ते पसंत पडलं नाही म्हणून तो ते वापस करण्याच्या विचारात होता. मात्र तोपर्यंत लुइस फिलिपची वेबसाइट हॅक झाली होती. एका ठगाने या व्यक्तिशी संपर्क साधला, आणि आपण लुइस फिलिपच्या कस्टमर केअरचा प्रतिनिधी असल्याचं सांगितलं. त्याने संबंधित व्यक्तीला सांगितलं की हे ब्लेजर तेव्हाच तू वापस करू शकशील जेव्हा तुझ्या मोबाईलवर एक अॅप इंस्टॉल करशील. त्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार या व्यक्तीने ते अॅप इंस्टॉल केलं. अॅप इंस्टॉल होताच त्या व्यक्तीच्या बँक खात्यातील सर्व पैसे गायब झाले.
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या व्यक्तीनं तातडीनं एसबीआयच्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क केला.तक्रार देखील दाखल केली. एसबीआयकडून त्याला सूचित करण्यात आलं की तुझं अकाउंट ब्लॉक करण्यात आलं आहे. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच आसाम पोलिसांच्या सायबर शाखेकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला. मात्र पैसे परत न मिळाल्यानं अखेर या व्यक्तीने याबाबत आरबीआयकडे आणि त्यानंतर यासंदर्भात त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.
सुप्रीम कोर्टात बँकनं आपली बाजू मांडताना सांगितलं की, हा जो सर्व प्रकार घडला आहे, तो सर्व थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून घडला आहे, त्यासाठी बँकेला जबाबदार ठरवता येणार नाही, मात्र तरी देखील सुप्रीम कोर्टानं या व्यक्तीला त्याचे पैसे वापस करण्याचे आदेश बँकेला दिले आहेत.