RamdevBaba: रामदेवबाबा तुम्ही सर्व आजार कसे बरे करू शकता?; ॲलोपॅथीविरोधात बोलून लोकांची दिशाभूल करू नका; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांनी सुनावणीवेळी सांगितले की, रामदेव, तुम्ही तुमची यंत्रणा लोकप्रिय करू शकता, मात्र इतरांवर टीका का करता ? ते योग लोकप्रिय करतात. पण त्यांनी इतर व्यवस्थेबाबत चुकीचे बोलणे टाळावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

RamdevBaba: रामदेवबाबा तुम्ही सर्व आजार कसे बरे करू शकता?; ॲलोपॅथीविरोधात बोलून लोकांची दिशाभूल करू नका; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 8:40 AM

नवी दिल्लीः ॲलोपॅथीविरोधात (allopathy) सतत शेरेबाजी करणाऱ्या पतंजली योगपीठाचे (Patanjali Yogpith) संस्थापक रामदेव बाबा (Ramdev Baba) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होताना दिसून येत आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) त्यांना नोटीस देऊन समन्स बजावण्यात आले आहे. ॲलोपॅथीविरोधात बोलल्याने सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना विचारण्यात आले आहे की, तुम्ही होणारे सर्व आजार बर करू शकता का याची काय हमी आहे? त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाकडून ॲलोपॅथीविरोधात बोलून लोकांची दिशाभूल करू नका अशी सुचनाही त्यांना देण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) याचिकेवर मंगळवारी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाकडून पतंजली आयुर्वेद आणि केंद्र सरकारलाही नोटीस बजावण्यात आली आहे.

ॲलोपॅथीची बदनामी करणाऱ्या जाहिराती दाखवल्याबद्दल न्यायालयाने याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.

तुम्ही इतरांवर टीका करू नका

भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांनी सुनावणीवेळी सांगितले की, रामदेव, तुम्ही तुमची यंत्रणा लोकप्रिय करू शकता, मात्र इतरांवर टीका का करता ? ते योग लोकप्रिय करतात. पण त्यांनी इतर व्यवस्थेबाबत चुकीचे बोलणे टाळावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे. ज्या गोष्टींबाबत रामदेव सातत्याने जे सांगत असतात, ते सर्व रोग त्याद्वारे ते बरे करतील का याची काय हमी देतात असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे. या खटल्याच्या सुनावणीत सहभागी असलेले दुसरे न्यायमूर्ती सी.टी. रविकुमार यांनी सांगितले की, रामदेव यांच्याकडून अॅलोपॅथीची थट्टा केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

लोकांची दिशाभूल करू नका

बाबा रामदेव यांनी कोरोना काळात कोरोनिल नावाचे औषध लॉन्च केले होते. त्याबाबत त्यांनी दावा केला होता की, त्या औषधाचे सेवन केल्याने कोरोनाबाधित रुग्ण बरा होतो. यासोबतच त्यांनी अ‍ॅलोपॅथिक औषध पद्धती आणि आरोग्य संस्थांकडून प्रमाणित करण्यात आलेल्या लसीवर कोरोनिलची विक्रीही वाढल्याची टीका केली होती, त्यावेळी त्यांनी लसीबाबत लोकांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला असल्याचे म्हणण्यात आले आहे.

हे वैद्यकीय शास्त्राचे अपयश

रामदेव म्हणाले होते की, लस मिळाल्यानंतरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना कोरोना व्हायरस झाला होता त्यामुळे हे वैद्यकीय शास्त्राचे अपयश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांनाही फटकारले होते. त्यांनी अ‍ॅलोपॅथीच्या विरोधात वक्तव्य करून लोकांची दिशाभूल करू नये, असे न्यायालयाने म्हटले होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.