निझामुद्दीनमधील तब्लिगींचा मस्तवालपणा, डॉक्टरांवर थुंकून शिवीगाळ
निझामुद्दीनमधील 'तब्लिग जमात'च्या मरकजमधून बाहेर काढलेल्या तब्लिगींना हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्यांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केले (Tablighi Jamaat misbehaved abused spit at Quarantine Centre)
नवी दिल्ली : निझामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’च्या मरकजमधून बाहेर काढलं जात असताना तब्लिगींचा मस्तवालपणा पाहायला मिळाला. दिल्लीत ‘कोरोना’ चाचणी घेणाऱ्या डॉक्टरांवरच काही तब्लिगी थुंकल्याचं समोर आलं आहे. काही जणांनी तर डॉक्टरांना शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे. (Tablighi Jamaat misbehaved abused spit at Quarantine Centre)
निझामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’च्या मरकजमधून बाहेर काढलेल्या काही तब्लिगींना हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आलं आहे. काही जण क्वारंटाईन करण्यात आले आहेत. क्वारंटाइन केलेल्या काही जणांनी वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांना शिवीगाळ करत थुंकण्याचा किळसवाणा प्रकार केला.
निझामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’च्या 167 जणांना तुघलकाबादमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये नेलं आहे. तर 97 जणांना रेल्वेच्या डिझेल शेड ट्रेनिंग स्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. 70 जणांना आरपीएफच्या बॅरेकमध्ये क्वारंटाईन केल्याची माहिती उत्तर रेल्वे विभागीय मंडळाचे जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी दिली.
क्वारंटाईन केलेल्या तब्लिगींपैकी काही जण सकाळपासून वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन करत आहेत. कर्मचाऱ्यांकडे ते अवाजवी खाद्यपदार्थांची मागणी करत आहेत. कर्मचारी-डॉक्टरांच्या अंगावरही थुंकत शिवीगाळ करत आहेत. एका जागी न थांबता होस्टेलमध्ये फिरत आहेत, असंही दीपक कुमार यांनी सांगितलं.
Occupants were unruly since morning&made unreasonable demand for food items. They misbehaved&abused staff at Quarantine Centre.Also they started spitting all over&on persons working/attending them incl doctors.They also started roaming around hostel building:CPRO Northern Railway https://t.co/mKLP1UQgJg
— ANI (@ANI) April 1, 2020
(Tablighi Jamaat misbehaved abused spit at Quarantine Centre)
‘तब्लिग जमात’मधल्या 19 तब्लिगींचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 389 जणांचे ‘कोरोना’ अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. 8 हजार 700 तब्लिगी निझामुद्दीनमधील मरकजला गेल्याचे समोर आले आहे. या सर्वांना लगेच ताब्यात घ्या आणि तब्लिगींच्या सहप्रवाशांनाही शोधा, असे केंद्राचे आदेश आहेत. या मोहिमेत गुप्तचर आणि दहशतवादविरोधी पथकही सहभागी झाले आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून गुप्तचर विभागाद्वारे माहिती काढून तब्लिगींची धरपकड केली जात आहे.
हे वाचा : निजामुद्दीनमधील ‘तब्लिग जमात’ ‘कोरोना’चा हॉटस्पॉट कसा ठरला?
दरम्यान, राज्यात परतलेल्या 31 तब्लिगींचे ‘कोरोना’ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये पुण्याच्या 20 तर सोलापुरातील 11 जणांचा समावेश आहे. पुण्यातील 10 तब्लिगींचे रिपोर्ट बाकी आहेत. सोलापुरातील तब्लिगींच्या संपर्कातील 14 जणही निगेटिव्ह आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे. सोलापूरच्या 17 पैकी 11 सहभागी परतले असून उर्वरित 6 तब्लिगींपैकी 2 ठाण्यात, तर 2 पुण्यात आहेत.
तब्लिग जमात म्हणजे नेमकं काय?
‘तब्लिग जमात’ ही एक धार्मिक संस्था आहे. 1920 पासून ही संस्था कार्यरत आहे. दिल्लीतील निजामुद्दीन भागात या संस्थेचं मुख्यालय आहे. भारतातील सर्व मोठ्या शहरात या संस्थेची ‘मरकज’ म्हणजेच केंद्रं आहेत. या केंद्रांमध्ये वर्षभर ‘इज्तेमा’ सुरु असतो. प्रत्येक ‘इज्तेमा’चा ठराविक दिवसांचा कालावधी चालतो.
(Tablighi Jamaat misbehaved abused spit at Quarantine Centre)