Hijab : हिजाब घालून मतदान करायला आलेल्या महिलेला भाजप कार्यकर्त्यानं रोखलं, तामिळनाडूतील प्रकार
Hijab Controversy : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपला नेहमीच असं करायचं होतं, असा आरोप त्यांनी केलाय.
तामिळनाडू : कर्नाटकातील हिजाब वादाचे (Karnataka Hijab Controversy) पडसाद महाराष्ट्रात उमटेल होते. आता हात वाद आणखीनच चिघळत चालला असून आता तो तामिळनाडू पर्यंत पोहोचला आहे. तामिळनाडूत एका मतदान केंद्रावर आलेल्या एका मुस्लिम महिलेला (Muslim Lady) रोखण्यात आलंय. भाजप कमिटीच्या एका सदस्यानं या महिलेला रोखलंय. ही महिला हिजाब घालून मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचली होती. महिला हिजाब घालून मतदान करायला आल्यानं तिला भाजपच्या एका कार्यकर्त्यानं (BJP Worker) रोखलंय. याबाबतचा व्हिडीओदेखील समोर आला असून एएनआयनं याबाबत ट्वीट केलं आहे. हिजाब न घातला मतदान करण्याचा अधिकार बजावावा, अशी मागणी यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. एकूण कर्नाटकापासून सुरु झालेला हिजाबविरुद्ध भगवा असा वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे.
पोलिसांचा हस्तक्षेप
भाजपच्या सदस्यांनी या महिलेला हिजाब काढून मतदान करण्याची माहणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. डीएमके आणि एआयएडीएमके्या सदस्यांनी या घटनेचा आणि या मागणीचा तीव्र विरोध केला आहे. अखेर पोलिसांनी याप्रकरणी हस्तक्षेप केलाय.
तामिळनाडूच्या मैदूरे जिल्ह्यातील मेलूर इथल्या मतदान केंद्रावर हा सगळा प्रकार घडला आहे. मतदान अधिकारी आणि पोलिसांनी अखेर याप्रकरणी महिलेला मतदान करणाऱ्यांवर कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
पाहा व्हिडीओ –
#TamilNadu Urban Local Body Poll |A BJP booth committee member objected to a woman voter who arrived at a polling booth in Madurai while wearing a hijab;he asked her to take it off. DMK, AIADMK members objected to him following which Police intervened. He was asked to leave booth pic.twitter.com/UEDAG5J0eH
— ANI (@ANI) February 19, 2022
भाजपवर टीका
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपला नेहमीच असं करायचं होतं, असा आरोप त्यांनी केलाय. तर आम्ही या सगळ्याच्या विरोधात असल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे. तामिळनाडूच्या जनतेला कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला निवडून द्यायचं नाही, हे माहीत आहे. तामिळनाडूची जनता या घटनेचा कधीच स्वीकार करणार नाही, असंही ते म्हणालेत.
11 वर्षांनंतर निवडणुका
अखेर पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी हस्तक्षेप केल्यानंतर अखेर महिलेला मतदानाचा अधिकार पार पाडता आला. तामिळनाडूत स्थानिक स्वराज्य संस्था्चाय निवडणुका पार पडत आहेत. पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतींच्या या निवडणुकीची रणधुमाळी गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूत पाहायला मिळाली होती. तब्बल 11 वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत. मद्रास हायकोर्टानं या निवडणुकांवर 2016 साली स्थगिती लावल्यामुळे या निवडणुका प्रलंबित होत्या. यानंतर वेगवेगळ्या कारणांमुळे या निवडणुका लांबणीवर पडत गेल्या होत्या. अखेर शनिवारी (19 फेब्रुवारी) या निवडणुका पार पडत असताना हिजाब वादाचे पडसाद उमटले आहेत.
कर्नाटक हायकोर्टात सुनावणी
हिजाब वादावर सध्या कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. शैक्षणिक संस्थेत हिजाब परिधान करणाऱ्याच्या विरोधात घेण्यात आलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. कर्नाटक सरकारनं हिजाब किंवा भगव्या रंगाच्या स्कार्प घालण्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप मुस्लिम विद्यार्थीनींनी केली आहे. हे सगळं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
संबंधित बातम्या :
Video | ‘अल्ला हूँ अकबर’ची घोषणा देणाऱ्या मुस्कानला दिले 5 लाख! कुणी दिलं बक्षिस?