AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Parliament | ‘ही’ भारतीय कंपनी नव्या संसदेचा निर्माण करणार, 7 कंपन्यांना मागे सारत मिळवलं कंत्राट

टाटा ग्रुपला संसद भवन बनवण्याचं कंत्राट 861.9 रुपयांमध्ये मिळालं आहे.

New Parliament | 'ही' भारतीय कंपनी नव्या संसदेचा निर्माण करणार, 7 कंपन्यांना मागे सारत मिळवलं कंत्राट
| Updated on: Dec 10, 2020 | 1:48 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ (Tata Group Will Construct The New Parliament) अंतर्गत साकारल्या जाणाऱ्या नवीन संसद भवनाचं भूमिपूजन आज मोदींच्या हस्ते पार पडलं. यावेळी रतन टाटा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते (Tata Group Will Construct The New Parliament).

काय तुम्हाला माहित आहे, या संसद भवनाची निर्मिती कुठली कंपनी करणार आहे? नाही, तर आम्ही तुम्हाला त्याबाबतची माहिती देतो. या नव्या संसदेची निर्मिती आपली स्वदेशी कंपनी टाटा ग्रुप करणार आहे.

टाटाने 7 कंपन्यांना मागे सोडलं

टाटा ग्रुपला संसद भवन बनवण्याचं कंत्राट 861.9 रुपयांमध्ये मिळालं आहे. पण, या पूर्ण भवनाला बनवण्यासाठी तब्बल 917 कोटी खर्च येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या संसदेला बनवण्यासाठी कंत्राट मिळवण्याच्या स्पर्धेत 7 कंपन्यांनी बोली लावली होती. या कंपन्यांमध्ये टाटा प्रोजेक्ट लिमिटेड, लार्सन अँड टूब्रो लिमिटेड, आईटीडी सिमेन्टेशन इंडिया लिमिटेड, एनसीसी लिमिटेड, शपूरजी पलोनजी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, उत्तर प्रदेशची राजकीय बांधकाम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि पीएसपी प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपन्यांचा समावेश होता. पण याचं कंत्राट हे टाटा ग्रुपला मिळालं.

दोन वर्षात संसद भवनाचं काम पूर्ण होणार

नव्या संसद भावनाचं निर्माण कार्य हे येत्या 21 महिन्यात पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावर 889 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. पण टाटा प्रोजेक्टने हे कंत्राट 862 कोटीमध्ये मिळवला आहे. म्हणजेच त्यावर 862 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

नवं संसद भवन कसं असणार?

नव्या संसद भवनाच्या बांधकामाला जवळपास 862 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळेच विरोधकांनी कोरोनाच्या काळात हा अनावश्यक खर्च केल्याचा आरोप करत मोदी सरकारवर जोरदार टीकाही केली आहे. हे बांधकाम सध्याच्या संसद भवनाच्या परिसरातच होणार आहे. 2022 पर्यंत हे काम पूर्ण होण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. 2022 मध्येच भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे स्वातंत्र्याचा हा उत्सव नव्या संसद भवनातच साजरा करण्याचा मोदी सरकारचा उद्देश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदेची ही नवी इमारतीचा विस्तार जवळपास 65,000 चौरसमीटर इतका असेल. याशिवाय या इमारतीचं 16921 चौरसमीटर बांधकाम जमिनीखालीही होणार आहे (Tata Group Will Construct The New Parliament).

संसदेची नवी इमारतही 3 मजली असणार आहे. यात एक ग्राऊंड फ्लोअर आणि त्यावर 2 मजले अशी रचना असेल. ही इमारत त्रिकोणी आकारात असेल. आकाशातून पाहिल्यास ही इमारत 3 रंगांमधील किरणांप्रमाणे दिसेल. संसदेतील लोकसभा इमारतीत 888 आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. भविष्यात वाढत्या सदस्य संख्येचा विचार करुन ही संख्या वाढवण्यात आली आहे. संयुक्त अधिवेशनात 1224 सदस्यांची बसण्याची व्यवस्था असेल. नव्या इमारतीतही एका बाकावर दोन खासदार अशीच बैठक व्यवस्था असेल. या बाकाची लांबी 120 सेंटीमीटर असेल. राज्यसभेच्या नव्या इमारतीत 384 आसनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

नव्या संसद भवनात एक संविधान हॉल असेल. त्यात भारताच्या लोकशाहीचा वारसा असलेल्या गोष्टींचं खुल प्रदर्शन असेल. या शिवाय खासदारांना ग्रंथालय, वेगवेगळ्या समित्यांसाठी वेगवेगळ्या खोल्या, खाण्याची प्रशस्त सुविधा आणि वाहनांच्या पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

या भवनात सर्वोच्च स्ट्रक्चरल सुरक्षा स्टॅण्डर्ड्सचं पालन केलं जाईल. यामध्ये भूकंप क्षेत्रातील 5 आवश्यकतांचे पालन करणेही सामील असले.

Tata Group Will Construct The New Parliament

संबंधित बातम्या :

नरेंद्र मोदी आज करणार नव्या संसद भवनाचं भूमिपूजन, पाहा काय आहे वैशिष्ट्ये आणि विस्तार

PHOTOS : जगातील सर्वात सुंदर संसदेच्या इमारती; काही नदीकाठी, तर काहींचं गुप्त बोगद्यांवर निर्माण

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.