Chandrababu Naidu : माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना गाढ झोपेत असतानाच अटक; अटकेचं कारण काय?

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, तेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा आणि देशातील एक महत्त्वाचे नेते चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. टीडीपीचे नेते नारा लोकेश यांना पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

Chandrababu Naidu : माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना गाढ झोपेत असतानाच अटक; अटकेचं कारण काय?
chandrababu naiduImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 09, 2023 | 8:48 AM

अमरावती | 9 सप्टेंबर 2023 : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, तेलगू देसम पार्टीचे सर्वेसर्वा आणि देशातील एक महत्त्वाचे नेते चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. पहाटे पहाटेच चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आळी आहे. टीडीपीनेच याबाबतची माहिती दिली आहे. भ्रष्टाचार प्रकरणी सीआयडीने ही कारवाई केली आहे. नायडू यांच्याविरोधात 2021मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर आज कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशात खळबळ उडाली आहे. चंद्राबाबू यांच्या अटकेमुळे आंध्रातील राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चंद्राबाबू नायडू आपल्या घरात होते. चंद्राबाबू नायडू गाढ झोपेत असतानाच सीआयडीची टीम धडकली. पहाटे 3 वाजता सीआयडीची टीमने आरके फंक्शन येथील कँम्पमधून चंद्राबाबूंना अटक केली. त्यांना नांदयाल रेंजचे डीआयजी रघुरामी रेड्डी आणि सीआयडीच्या टीमने अटक केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

चंद्राबाबू हे नंदयाला दौऱ्यावर होते. एका बसमध्ये ते थांबले होते. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. आधी पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांना अटक केली. कौशल विकास घोटााळ्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान कौशल विकास घोटाळ्याची कोणत्याही पुराव्याशिवाय कोर्टात केस सुरू असताना चंद्राबाबू यांना अटक करण्याची गरज काय? असा सवाल या निमित्तान केला जात आहे. चंद्राबाबूंच्या वकिलांनी कागदपत्रे आणि एफआयआरची कॉपी मागितली असता आम्ही तुम्हाला रिमांड रिपोर्ट देऊ शकत नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

वायएसआर काँग्रेसचे नेते आणि मंत्र्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्यावर आरोप केला होता. चंद्राबाबूंनी 118 कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्याशिवाय चंद्राबाबूंवर 350 कोटींच्या घोटाळ्याचा आरोपही आहे. हे सर्व प्रकरण पाहता आपल्याला अटक होईल असं चंद्राबाबू यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यानंतर आज त्यांना अटक झाली.

मुलालाही अटक

चंद्राबाबू नायडू यांचे चिरंजीव आणि टीडीपीचे नेते नारा लोकेश यांना पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. टीडीपीच्या सोशल मीडियाने याबाबतची माहिती दिली आहे. लोकेश यांचा व्हिडीओही जारी करण्यात आला आहे. लोकेश चंद्राबाबू यांना भेटू शकत नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.