Dirty Teachers: एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थिनींना बोलवत होते शिक्षक, मग कॅफेत करत होते घाणेरडे चाळे, शाळेतील डर्टी पिक्टर

या शिक्षकांना तातडीने अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. काही शिक्षकांनी शाळेच्या मॅनेजमेंटकडेही तक्रार केल्याची माहिती आहे. शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणीही जोर धरु लागली आहे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरु राहील असा इशारा पालकांनी दिला आहे.

Dirty Teachers: एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली विद्यार्थिनींना बोलवत होते शिक्षक, मग कॅफेत करत होते घाणेरडे चाळे, शाळेतील डर्टी पिक्टर
शिक्षकांचे अश्लील चाळे Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 7:09 PM

हनुमानगड- एक्स्ट्रा क्लासच्या (Extra classes)नावाखाली काही शिक्षकांनी विद्यार्थिनींना (teachers ask to come in school)जबरदस्तीने शाळेत बोलावले आणि नंतर त्यांना घेऊन शिक्षक कॅफेत (cafe)गेले. कॅफेत गेल्यानंतर या शिक्षकांनी त्यांच्याशी अश्लील चाळे केले आणि हे कुणाला सांगू नका, अशी धमकीही त्यांना दिली. एका खासगी शाळेत हा सगळा गंभीर प्रकार घडला आहे. शाळेत गेललेल्या या विद्यार्थिनी उशीर झाल्या तरी परतल्या का नाहीत, याच्या काळजीत त्यांचे आई-वडील होते. त्यातील काही जण शाळेत पोहोचले. तेव्हा आपल्या मुली शाळेत आल्याच नव्हत्या अशी धक्कादायक माहिती त्यांच्या पालकांना मिळाली. यानंतर पालक घरी परतले, त्यांनी या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली, त्यानंतर काही वेळात या विद्यार्थिनी घरी परत आल्या. हा सगळा प्रकार घडला आहे तो राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील रावतसर या गावातील एका शाळेत. संतापलेल्या पालकांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

एक्स्ट्रा क्लाससाठी बोलावून करत होते घाणेरडे चाळे

तीन विद्यार्थिनींचे कुटुंबीय एकत्रित पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या परिसरातील एका प्रतिष्ठित शाळेतील काही शिक्षक विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. या विद्यार्थिनींना शिक्षकांकडून एक्स्ट्रा क्लासेसच्या नावाखाली बोलावले जात असे. तसेच शाळेत असल्या तर त्यांना एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली थांबवण्यात तरी येत असे. शाळा संपल्यानंतर अनेकदा या विद्यार्थइनींना जबरदस्तीने कॅफेतही नेण्यात येत असे. सोमवारी या प्रकरणी तक्रार केल्यानंतर, कुटुंबीयांनी शाळेच्या बाहेर आंदोलनही केले. त्या ठिकाणी थोड्या वेळात मोठी गर्दीही जमा झाली होती.

शिक्षकांच्या अटकेची आणि शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी

शाळेबाहेर झालेल्या या आंदोलनानंतर आणखीही काही पालक समोर आले आहेत. त्यांच्याही मुलींसोबत हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या शिक्षकांना तातडीने अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे. काही शिक्षकांनी शाळेच्या मॅनेजमेंटकडेही तक्रार केल्याची माहिती आहे. शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणीही जोर धरु लागली आहे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरु राहील असा इशारा पालकांनी दिला आहे. दरम्यान या प्रकरणावर शाळेच्या मॅनेजमेंटकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिसांनीही या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. एकूणच या प्रकराने शाळा, त्यात दिले जाणारे शिक्षण आणि शिक्षक यांच्याबाबतचा गंभीर प्रश्न समोर उभा राहिला आहे.

हे सुद्धा वाचा

हेही वाचा

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.