Tejashwi Yadav: तेजस्वी यादव कोणत्या मतदारसंघातून लढतायत; कोण आहेत प्रतिस्पर्धी उमेदवार?

नव्वदीच्या दशकापासून या मतदारसंघाची लालूप्रसाद यादव यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण होण्यास सुरुवात झाली. | bihar election result 2020

Tejashwi Yadav: तेजस्वी यादव कोणत्या मतदारसंघातून लढतायत; कोण आहेत प्रतिस्पर्धी उमेदवार?
तेजस्वी यादव पहिल्यांदा 2015 मध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या तिकिटावर राघोपूर मतदारसंघातून निवडून आले. यानंतर ते नितीश सरकारमध्ये नोव्हेंबर 2015 आणि जुलै 2017 मध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री झाले.
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 8:17 AM

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीचा (Bihar Election 2020) संपूर्ण निकाल स्पष्ट होण्यास आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. प्रत्यक्ष मतमोजणी सुरु झाल्यानंतर एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महागठबंधन विजयी ठरणार का, हे पाहावे लागेल. यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ‘राजद’चे नेते तेजस्वी यादव हे सर्वाधिक लक्षवेधी चेहरे ठरले आहेत. (Tejashwi Yadav rjd raghopur constituency result 2020)

एक्झिट पोलच्या निकालानंतर तेजस्वी यादव यांची प्रचंड चर्चा रंगली आहे. गेल्या दोन दिवसांपासूनच सोशल मीडियावर सर्वत्र त्यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला कडवी टक्कर देणाऱ्या तेजस्वी यांच्याबद्दलची लोकांच्या मनातील उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे तेजस्वी यादव निवडणूक लढवत असलेला राघोपुर मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदारसंघात येणारी राघोपुरच्या जागेवर तेजस्वी यादव निवडणूक लढवत आहेत. याठिकाणी त्यांच्याविरोधात भाजपचे नेते सतीश कुमार आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते राकेश रोशन रिंगणात आहेत. राघोपुर मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून याठिकाणी आतापर्यंत 20 निवडणुका झाल्या आहेत. यापैकी प्रत्येकी पाच-पाच वेळा काँग्रेस आणि राजदने या मतदारसंघात विजय मिळवला आहे. तर जनता दल आणि संयुक्त सोशालिस्ट पार्टीने प्रत्येकी दोनवेळा येथील निवडणूक जिंकली आहे. तर संयुक्त जनता दलाला केवळ एकदाच राघोपूर विधानसभा मतदारसंघात विजय मिळाला आहे. नव्वदीच्या दशकापासून या मतदारसंघाची लालूप्रसाद यादव यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण होण्यास सुरुवात झाली. या मतदारसंघात 30 टक्के यादव मतदार आहेत. तर भूमिहार आणि पासवान मतदारांचीही संख्याही लक्षणीय आहे.

यापूर्वी 2015 मध्येही तेजस्वी यादव यांनी राघोपुर मतदारसंघातूनच निवडणूक लढवली होती. तेव्हादेखील तेजस्वी यादव यांनी सतीश कुमार यांना धूळ चारली होती. मात्र, यंदा तेजस्वी यांची लोकप्रियता पाहता त्यांना राघोपुरमधून विक्रमी मताधिक्याने विजय मिळण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये कुणाचं सरकार? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी

Tv9 महाएक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 110 ते 120

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 115 ते 125

लोजप – 3 ते 5

अन्य – 10 ते 15

ABP न्यूज -सीव्होटरचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 104 ते 128

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 108 ते 131

रिपब्लिक टीव्ही- जनकी बातचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 91 ते 117

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 136 ते 138

टाईम्स नाऊ-सीव्होटरचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 116

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 120

लोजप – 1

अन्य – 6

संबंधित बातम्या:

Tejashwi Yadav LIVE News and Updates: तेजस्वी यादव बिहारचे नवे ‘बाहुबली’ होणार का?

Bihar Election Result 2020 LIVE | बिहारमध्ये मतमोजणीला सुरुवात, पहिला कल भाजपला, 5 जागांवर आघाडीवर

(Tejashwi Yadav rjd raghopur constituency result 2020)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.