तेजस्वी यादवांचे एनडीएवर टीकास्त्र, महाआघाडी ‘धन्यवाद यात्रा’ काढणार

बिहारच्या मतदारांचे आभार मानन्यासाठी तेजस्वी यादव धन्यवाद यात्रा काढणार आहेत. ( Tejashwi Yadav will organize rally in Bihar )

तेजस्वी यादवांचे एनडीएवर टीकास्त्र, महाआघाडी 'धन्यवाद यात्रा' काढणार
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 4:48 PM

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुकीचे निकाल एनडीच्या बाजूने तर जनतेचा निर्णय आमच्या बाजूनं आहे,” असं तेजस्वी यादव म्हणाले. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच तेजस्वी यादव यांनी महाआघाडीतील पक्षांसोबत बैठक घेतली. बिहारच्या मतदारांचे आभार मानन्यासाठी तेजस्वी यादव लवकरच धन्यवाद यात्रा काढणार आहेत. ( Tejashwi Yadav will organize rally in Bihar for giving thanks to voters)

तेजस्वी यादव यांनी महाआघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांना राजद विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले. महाआघाडीने निवडणुकीत जनतेसमोर जाताना सकारात्मक आणि जनतेच्या मुद्यांना प्राधान्य दिले. या मुद्यांना लोकांचे भरपूर पाठबळ मिळाले, असल्याचे तेजस्वी यादव यांनी सांगितले.

नितीश कुमाररांवर टीकास्त्र तेजस्वी यादव यांनी जे तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत ते आजही सत्तेत बसण्यासाठी तयार असल्याची टीका नितीश कुमार यांचे नाव न घेता केली. ” नितीश कुमारांमध्ये थोडीफार नैतिकता राहिली असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा”,असं आव्हान तेजस्वी यादव यांनी दिले.

सर्व आमदारांना पाटणामध्ये थांबण्याची विनंती महाआघाडीच्या सर्व आमदारांनी पाटणा येथे थांबण्याचे आवाहन तेजस्वी यादव यांनी केले. महाआघाडीचेच सरकार येईल, असंही त्यांनी सांगितले. बिहारच्या जनतेचे आभार मानण्यासाठी महाआघाडी संपूर्ण राज्यात धन्यवाद यात्रा काढणार आहे. ( Tejashwi Yadav will organize rally in Bihar for giving thanks to voters)

भाजपवर टीकास्त्र

राजद बिहारमधील सर्वात मोठा पक्ष आहे. राजदला सर्वात मोठा पक्ष बनण्यापासून भाजपही रोखू शकला नाही. साम, दाम आणि बळाचा वापर करुन राजदला रोखण्याचा प्रयत्न झाला मात्र, सर्वात मोठा पक्ष होण्याचा जनादेश जनतेने आम्हाला दिला आहे, असं तेजस्वी यादव म्हणाले.

एनडीएनं 243 जागांपैकी 125 जागांवर तर महाआघाडीनं 110 जागांवर विजय मिळवला. बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी भाजपनं 74, जेडीयूनं 43 आणि हिदुस्तान आवाम मोर्चा आणि विकाससील इन्सान पार्टीनं प्रत्येकी चार जागांवर विजय मिळवला.

तर राजद काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीने 110 जागांवर विजय मिळवला. राजदनं 75, काँग्रेस 19 तर डाव्या पक्षांनी 16 जागांवर विजय मिळवला. एमआयएमनं सीमांचलमधील 5 जागांवर विजय मिळवला आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या काळात सरकारी यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला. बॅलेट पेपरवरील पोस्टल मतदानाची मोजणी नंतर करण्यात आली. यातील अनेक मतं रद्द करण्यात आली, असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला. राजदनं निकालाच्या दिवशी 119 जागावंर महाआघाडीचे उमेदवार विजयी झाल्याचा दावा केला होता. मतमोजणीमध्ये फेरफार होत असल्याचा आरोप करत महाआघाडीचे नेते निवडणूक आयोगाकडे गेले होते. मात्र, निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले.

संबंधित बातम्या : 

‘बिहारमध्ये सत्ता महागठबंधनचीच येणार’, तेजस्वी यादव यांचं आमदारांना आश्वासन

Photos | बिहारच्या मुख्यमंत्रिपदापासून ’12’ पाऊलं दूर, तेजस्वी यादवांची पाटण्यात आमदारांसोबत बैठक

( Tejashwi Yadav will organize rally in Bihar for giving thanks to voters)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.