अमित शहांना सांगा इस्रोची निर्मिती काँग्रेसने केली, या नेत्याची भाजप-बीआरएसवर जोरदार टीका

लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याने एकमेकांवर आरोप करण्याचे प्रत्यारोप करायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने भाजप-बीआरएसवर जोरदार टीका केली आहे. कालच्या त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सुध्दा चांगलाचं व्हायरल झाला आहे.

अमित शहांना सांगा इस्रोची निर्मिती काँग्रेसने केली, या नेत्याची भाजप-बीआरएसवर जोरदार टीका
Mallikarjun KhargeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 9:26 AM

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यात तेलंगणा (telangana) राज्यात निवडणुका होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे त्या राज्यात आतापासून राजकीय नेत्यांनी भेटी वाढवल्या आहेत. शनिवारी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) तिथं होते, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) तिथं जाणार आहेत. अमित शहा आज तेलंगणा राज्यात भेट देणार असल्यामुळे काल मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांच्यावर निशाना साधला आहे. हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ज्यावेळी अमित शहा येतील तेव्हा त्यांना सांगा इस्रोची निर्मिती काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसने देशात ५६२ संस्थानांचे विलीनीकरण केले

मल्लिकार्जुन खरगे पुढे बोलताना म्हणाले की, अमित शहा विचारत आहेत की, काँग्रेसने मागच्या ५३ वर्षात काय केलं, तर त्यांना आमचं रिपोर्ट कार्ड आठवणीने सांगा. ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर काँग्रेसने देशात ५६२ संस्थानांचे विलीनीकरण केले. सरदार पटेल यांनी देशाला एकत्र केलं. देशाला संविधान हे आंबेडकर आणि काँग्रेसने दिलं. त्याचबरोबर आईआईटी, आईएमएम, एम्स, इसरो, डीआरडीओ, HAL, ओएनजीसी, BEL, सेल हे सगळं पंडित नेहरु आणि काँग्रेसने दिलं असल्याचं सुध्दा आवर्जून सांगितलं.

ही काँग्रेसची देणगी आहे.

ज्यावेळी देशात एक सुई सुध्दा तयार झाली नव्हती. त्यावेळी आम्ही मोठे-मोठे कारखाने तयार केले. हैदराबाद, बेंगळुरू, मुंबई, कोलकाता, दिल्ली, कानपूर आम्ही देशात सगळीकडं कारखाने तयार केले आहेत. ही काँग्रेसची देणगी आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी भाजपचे नेते जातात आणि काँग्रेसवर टीका करतात.

हे सुद्धा वाचा

केसीआर भाजपच्या विरोधात बोलायला तयार नाही

आम्ही सगळ्यांनी भाजपला हटवण्याची तयारी केली आहे. परंतु केसीआर एका सुध्दा मिटींगला आली नाही. त्यांनी भाजपसोबत गठबंधन केल्याचा आरोप सुध्दा खरगे यांनी केला. ज्यावेळी आतमध्ये एकमेकांचा करार झाला असेल त्यामुळे केसीआर भाजपच्या विरोधात बोलायला तयार नाही. आम्ही काय मीटिंग करीत आहोत. त्यामुळे आम्हाला भाजप आणि केसीआर या दोन पक्षांना इथून हटवायचं आहे.

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.