PoK मधून 250-300 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत, कुपवाडात 2 जणांचा खात्मा

पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत (Terrorist from PoK trying to Infiltrate in India).

PoK मधून 250-300 दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत, कुपवाडात 2 जणांचा खात्मा
Soldiers in Jammu and Kashmir. (Photo: IANS)
Follow us
| Updated on: Jul 11, 2020 | 4:45 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण शस्त्रसंधी उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर अनेक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे (Terrorist from PoK trying to Infiltrate in India). पाकिस्तानमधील जवळपास 50 टक्के दहशतवादी तळ (लाँचिंग पॅड) सक्रीय झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील या दहशतवादी तळांवरील अनेक दहशतवादी सध्या भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील या दहशतवादी तळांमध्ये अलबदर (Albadhar), लश्कर-ए-तोय्यबा (Lashkar-e-Taiba) आणि जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) अशा अनेक दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. या दहशतवादी संघटनांचे अनेक सदस्य भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन दहशतवाद्यांना सीमेवरुन घुसखोरी करण्यात मदत केली जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने होणाऱ्या सैन्य कारवाईनंतर पाकिस्तानमधून नव्या दहशतवाद्यांना भारतात पाठवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

जीओसी 19 इन्फ्लेमेट्री डिव्हिजन, बारामूलाचे मेजर जनरल विरेंद्र वत्स यांनी सांगितले, “आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये तयार करण्यात आलेले हे दहशतवादी तळ पूर्णपणे शस्त्रसज्ज आहेत. या तळांवर जवळपास 250-300 दहशतवादी असल्याचा अंदाज आहे.”

कुपवाड्यात दोन दहशतवादी ठार

दरम्यान, कुपवाडामध्ये भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा मोठा डाव उधळला. सैन्याने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा मोठं नियोजन हाणून पाडण्यात आला. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नौगाम सेक्टरच्या हंदवारा येथे ही घटना घडली. सैन्याने दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर टुटमार गली भागात संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

यानंतर सैन्याने केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्म करण्यात आला. त्यांच्याकडून 2 एके-47 आणि अन्य शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आले. या चकमकीनंतर सैन्याने शोधकार्य सुरु केलं आहे.

हेही वाचा :

Jammu and Kashmir | भाजप नेते वसीम बारी यांची हत्या

भारतीय लष्कराचा मोठा निर्णय, जवानांना Facebook, Tik Tok सह 89 अ‍ॅप डिलीट करण्याचे आदेश : सूत्र

ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘चाणक्य’नीती, अजित डोभाल मैदानात उतरण्याची चिन्हं

Terrorist from PoK trying to Infiltrate in India

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.