मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अचानक देशाला संबोधन, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 3 मोठ्या घोषणा
नव्या वर्षात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात केली जाणार आहे. मोदींनी देशाला केलेल्या संबोधनात ही घोषणा केली. यासोबत त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्यासह ज्येष्ठांसाठी देखील मोदींनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज अचानक संबोधित केलं. मोदींच्या ह्या छोट्याशा संबोधनात त्यांनी तीन मोठे निर्णय जाहीर केले. त्यात 15 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुला मुलींना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. 3 जानेवारी 2022 पासून ह्या लसीकरणाला देशात सुरु होईल असही पंतप्रधान म्हणाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसरी मोठी घोषणा ही 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी त्यातही जे कोमॉर्बिड आहेत त्यांच्यासाठी केली. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्री कॉशनरी लस घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल असं पंतप्रधान म्हणाले. त्याची सुरुवात मात्र नव्या वर्षात 10 जानेवारीपासून करण्यात येईल असं मोदींनी जाहीर केलं.
15 साल से 18 साल की आयु के बीच के जो बच्चे हैं, अब उनके लिए देश में वैक्सीनेशन प्रारंभ होगा।
2022 में, 3 जनवरी को, सोमवार के दिन से इसकी शुरुआत की जाएगी: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 25, 2021
ज्येष्ठांसाठीही प्री-कॉशनरी डोस!
60 वर्षांवरील ज्येष्ठांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रॉकॉशनरी डोस दिला जाईल. येत्या 10 जानेवारीपासून हे लसीकरण सुरु केलं जाईल, असं मोदींनी यावेळी म्हटलं. त्याचप्रमाणं फ्रंट लाईन आरोग्य कर्माचाऱ्यांना प्रॉकॉशनरी कोरोना लसीचा डोस दिला जाईल, असंही मोदी यावेळी म्हणाले आहेत. गंभीर आजारांपासून पीडित असलेल्या आणि कोमॉर्बिड असलेल्या ज्येष्ठ नागरीकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रॉकॉशनरी लस दिली जाणार आहे.
60 वर्ष से ऊपर की आयु के कॉ-मॉरबिडिटी वाले नागरिकों को, उनके डॉक्टर की सलाह पर वैक्सीन की Precaution Dose का विकल्प उनके लिए भी उपलब्ध होगा।
ये भी 10 जनवरी से उपलब्ध होगा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 25, 2021
वाचा मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे –
-
मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे वर्ष संपतंय. वर्ष संपण्यासोबत आता कोरोनाचा नवा व्हेरीएट ओमिक्रॉनमुळ जगभरात संसर्ग वाढतोय.
-
देशातही रुग्णसंख्या वाढते आहे. कुणीही घाबरु जायचं कारण नाही आहे.
-
सगळ्यांनी सावध राहावं, सतर्क राहावं. काळजी घ्यावी. हात धुवत राहायला विसरायचं नाही आहे.
-
व्हायरस म्युटेट होत असल्यामुळे आपल्याला कोरोनाशी लढण्याची ताकदही वाढते आहे. त्यातही गुणाकार होतो आहे.
-
देशात आता १८ लाख आयसोलेशन बेड्स आहेत. ५ लाख ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स आहेत. १ लाख ४० हजार आयसीयू बेड्स आहेत.
-
देशात ३ हजारपेक्षा जास्त पीएसए ऑक्सिजन प्लांट आहेत ४ लाख ऑक्सिजन सिलिंडर देशभरात दिले गेले आहेत.
-
राज्यातला लागणारी बफर डोस तयार करण्यासाठी आपण सज्ज आहोत. चाचण्यांची क्षमता वाढवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.
-
लसीकरण हे कोरोना संसर्गात महत्त्वाचं काम करत आहे. लसीकरणात भारतानं मैलाचा दगड पार केलाय.
-
पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाची राज्य असलेल्या गोवा, उत्तराखंड, हिमाचलमध्ये पहिल्या डोसचं शंभर टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे.
-
लवकरच देशात नेसल आणि डीएनए लसीनाही मान्यता मिळणार आहे.
-
कोरोना अजूनही गेलेला नाही. सतर्कता अत्यंत महत्त्वाची आहे. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी, देशातील नागरीकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही अविरतपणे काम करत आहोत.
-
सध्या ओमिक्रॉनची चर्चा जोरात सुरु आहे. याबाबतचे अनुमानही वेगवेगळे आहे. ओमिक्रॉनवर देशातील वैज्ञानिकही बारकाईनं नजर ठेवून आहेत. याचा अभ्यास करत आहेत. आता जे अध्ययन देशातील संशोधकांनी केलं आहे, त्यानुसार नवे निर्णय घेण्यात आले आहेत.