Monkey pox alert – मंकीपॉक्स आजाराबाबत केंद्र सरकार गंभीर, लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करणार, नवे निर्बंध ? जगात वाढती रुग्णसंख्या

मार्गदर्शक सूचनांमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही बंधनेही टाकण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या देशात मंकीपॉक्सचा रुग्ण नसल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र जगात हा आजार गतीने वाढतो आहे.

Monkey pox alert – मंकीपॉक्स आजाराबाबत केंद्र सरकार गंभीर, लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करणार, नवे निर्बंध ? जगात वाढती रुग्णसंख्या
मंकीपॉक्सImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 9:34 PM

नवी दिल्ली मंकी पॉक्स या आजाराबाबत (monkey pox disease)जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानंतरआता केंद्र सरकारनेही (The central government) हा आजार गांभिर्याने घेतला आहे. या आजाराबाबत काही मार्गदर्शक सूचना (guidelines)केंद्र सरकार लवकरच जारी करणार आहे. कोरोना महामारीच्या काळातच आलेल्या या मंकीपॉक्सच्या संकटामुळे जगातील सगळ्याच देशाची चिंता वाढली आहे. मार्गदर्शक सूचनांमध्ये सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही बंधनेही टाकण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या देशात मंकीपॉक्सचा रुग्ण नसल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र जगात हा आजार गतीने वाढतो आहे. अशा स्थितीत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत. जगातील काही देशांत मंकीपॉक्स झालेल्या रुग्णांना २१ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनंही हा आजार गंभिर्याने घेतला आहे. कोणत्याही देशात या आजाराचा एकही रुग्ण सापडला तरी तो उद्रेक मानण्यात येणार आहे. मुंबईतही याची पूर्वतयारी करत, कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये २८ बेड्सचा आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे.

गर्भवती महिला आणि मुलांना जास्त धोका

मंकीपॉक्ससारख्या दुर्मीळ आजाराचे संक्रमण झाल्यास हा आजार काही कालावधीने आपोआप बरा होतो. मात्र काही जणांसाठी हा गंभीर होण्याची भीती असल्याचे जागितक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. यात लहान मुले, गर्भवती महिला आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्यांचा समावेश आहे. ५ वर्षांखालील मुलांना याचे संक्रमण लगेच होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

कोणकोणत्या देशात साप़डले रुग्ण

आत्तापर्यंत इंग्लंड, अमेरिका इटली, स्वीडन, फ्रान्स, पोर्तुगाल, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, नेदरलँड, इस्र्यायल, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले आहेत. गेल्या ३ आठवड्यांत या रुग्णांची संख्या वाढली आहे

काय आहे मंकीपॉक्स, कसा होतो फैलाव

मंकीपॉक्स हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. जे १९५८ साली कैदेत असलेल्या एका माकडाला झालेले आढळून आले होते. १९७० साली या आजाराचे संक्रमण माणसांनाही होत असल्याचे समोर आले.

मंकीपॉक्सचे संक्रमण हे डोळे, नाक आणि तोंडाच्या माध्यमातून पसरते. रुग्णाचे कपडे, भांडी आणि पांघरुणाला स्पर्श केला तरी हा आजार पसरण्याची शक्यता आहे. तसचं माकडं, उंदीर अशा जनावरांना मारल्याने किंवा त्यांच्या रक्ताच्या संपर्कात आल्यास मंकीपॉक्स होण्याची शक्यता आहे.

मंकीपॉक्सची काय आहेत लक्षणे

मंकीपॉक्सची लक्षणे संक्रमणानंतर पाचव्या ते २१ व्या दिवसांपर्यंत दिसतात. सुरुवातीची लक्षणे ही फ्ल्यू सारखी आहेत. यात ताप, डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, हातपायांत थरथर,दमल्यासारखे वाटणे अशी याची प्राथमिक लक्षणे आहेत. त्यानंतर चेहऱ्यावर पुळ्या येण्यास सुरुवात होते. त्यानंतर हे फोड शरिराच्या इतर भागांवरही पसरतात. काही दिवसांनी या पु्ळ्या बऱ्या होतात.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.