ताज महालावर जयपूरच्या शाही घराण्याचा दावा, राजघराण्याच्या दीया कुमारी म्हणाल्या, महाल आमचा, आमच्याकडे कागदपत्रं

ताजमहाल हा पूर्वी जयपूरच्या राज परिवाराचा महाल होता, याची कागदपत्रे उपलब्ध असल्याचाही दिया कुमारी यांचा दावा आहे. या महालावर नंतर शहाजहान याने कब्जा केला, असेही त्या सांगतात. बादशाहा शहाजहान याने जेव्हा जयपूर राजघराण्याकडून हा महाल आणि जमीन घेतली, तेव्हा राजघराणे विरोध करु शकले नाही.

ताज महालावर जयपूरच्या शाही घराण्याचा दावा, राजघराण्याच्या दीया कुमारी म्हणाल्या, महाल आमचा, आमच्याकडे कागदपत्रं
Diya Kumari claims on Taj MahalImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 2:50 PM

जयपूर – जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताज महालावरुन (Taj Mahal)सध्या अनके दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. ताजमहालाच्या बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्यात याव्यात अशी याचिकाही अलाहाबाद हायकोर्टाच्या खंडपीठाकडे करण्यात आली आहे. यातच आता जयपूरच्या शाही घराण्याने (Jaipur royal family) ताजमहाल ही आपल्या राजघराण्याची मालमत्ता असल्याचा दावा केला आहे. राजघराण्याच्या सदस्या आणि भाजपाच्या खासदार दीया कुमारी (BJP MP Diya Kumari)यांनी दावा केला आहे की ताजमहालाच्या जागी जयपूरच्या राजे घराण्याचा महाल होता. ताजमहालाचे बंद जरवाजे उघडण्याची करण्यात आलेली मागणी ही चांगली असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. या मागणीमुळे सत्य समोर येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर राजघराणेही लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.

कागदपत्रे असल्याचा दावा

ताजमहाल हा पूर्वी जयपूरच्या राज परिवाराचा महाल होता, याची कागदपत्रे उपलब्ध असल्याचाही दिया कुमारी यांचा दावा आहे. या महालावर नंतर शहाजहान याने कब्जा केला, असेही त्या सांगतात. बादशाहा शहाजहान याने जेव्हा जयपूर राजघराण्याकडून हा महाल आणि जमीन घेतली, तेव्हा राजघराणे विरोध करु शकले नाही, कारण त्यावेळी शहाजहान हा बादशाहा होता आणि तो संपूर्ण देशावर शासन करीत होता.

त्यावेळी दाद मागणेच शक्य नव्हते

दिया कुमारी म्हणतात आजही कुठलंही सरकार एखादी जमीन अधिग्रहित करते, त्यावेळी त्याबदल्यात मोबदला दिला जातो. त्यावेळी या महालाच्या मोबदल्यात काही तरी मिळाले होते, मात्र त्याविरोधात दाद मागण्याचा असा कोणताही कायदा नव्हता, किंवा याविरोधात कुठे दाद मागण्याचीही सोय नव्हती. आता कुणीतरी या प्रकरणात कोर्टात याचिका केली आहे, हे चांगलेच आहे.

हे सुद्धा वाचा

रामाचे वंशज असल्याचाही केला होता दावा

अयोध्येतील राम मंदिराच्या वेळी रामाच्या वंशजाचा मुद्दा जेव्हा समोर आला होता, तेव्हा जयपूरच्या शाही घराण्याने दावा केला होता की, ते रामाचे वंशज आहेत. या प्रकरणात ते कोर्टात साक्ष देण्यासही तेव्हा तयार होते.

ताजमहाल तोडू नका, पण..

दिया कुमारी पुढे म्हणाल्या, ताजमहाल तोडा असे मी म्हणत नाही, मात्र त्याच्या खोल्या उघडल्य़ा जायल्या हव्यात. ताजमहालातील अनेक भाग, खोल्या या बंद आणि सील आहेत, त्या उघडल्या जायला हव्यात. त्यामुळे काय होते आणि काय नव्हते, हे स्पष्ट होईल. याची पूर्ण चौकशी केल्यानंतरच या प्रकरणातील सत्य बाहेर येईल. तूर्तास या प्रकरणात कोर्टात जाणार नाही, मात्र या सगळ्यावर लक्ष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

कोर्टाने मागणी केली तर कागदपत्रे देणार

जर या प्रकरणात कागदपत्रांची आवश्यकता भासली तर जयपूरच्या आधीच्या राजघराण्याचा पोथीखाना आहे, त्यात पुरावे सापडतील असेही त्यांनी सांगितले. शहाहानला त्यावेळी जयपूर घराण्याचा हा महाल आवडला होता, आणि त्याने त्यावर कब्जा केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे दीया कुमारी यांचे म्हणणे आहे. या ठिकाणी मंदिर होते का, या प्रश्नावर अद्याप सर्व कागदपत्रे पाहिली नसल्याचे दिया कुमारी यांनी सांगितले आहे. मात्र ही मालमत्ता जयपूरच्या राजघराण्याची असल्याचा त्यांचा दावा आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.