Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona vaccine | कोव्हिशिल्ड लस 70 टक्के प्रभावी; लवकरच वितरणाला सुरुवात, आदर पुनावाला यांची माहिती

अ‍ॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे विकसित करण्यात येत असलेली 'कोव्हिशिल्ड' ही लस 70 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे.

Corona vaccine | कोव्हिशिल्ड लस 70 टक्के प्रभावी; लवकरच वितरणाला सुरुवात, आदर पुनावाला यांची माहिती
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 12:01 PM

मुंबई : अ‍ॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे विकसित करण्यात येत असलेली ‘कोव्हिशिल्ड’ ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 70 टक्के प्रभावी ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे. तशी माहिती सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला (adar poonawalla) यांनी दिली आहे. (The Covishield vaccine is 70 percent effective to prevent corona virus infection)

जगभरात कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. अनेक देशांत पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. तर राज्यात पुणे, मुंबई सारख्या शहरात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लशीबाबत दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. अ‍ॅस्ट्राझेन्का आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे विकसित करण्यात येणारी ‘कोव्हिशिल्ड’ ही लस कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 70 टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली आहे.

“कमी किमतीत उपलब्ध होणारी कोव्हिशिल्ड लस एका प्रकारच्या डोसमध्ये कोरोनावर 90 टक्के प्रभावी ठरत आहे. तर दुसऱ्या प्रकारच्या डोसमध्ये 62 टक्के प्रभावी आहे. याबाबतची विस्तृत माहिती संध्याकाळी देण्यात येईल.” असं आदर पुनावाला म्हणाले आहेत. तसेच, या लसचे वितरणदेखील लवकरच सुरु होईल असेही त्यांनी सांगितलं आहे.

कोव्हिशिल्ड लशीची किंमत 500 ते 600 रुपये

‘कोव्हिशिल्ड’ ही लस फेब्रुवारी महिन्यात भारतात वितरीत व्हायला सुरुवात होईल. या लसीची किंमत 500 ते 600 रूपये इतकी असेल. त्यामुळे कोरोनाच्या संकटामुळे तणावाखाली असलेल्या भारतीयांना खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सिरम इन्स्टिट्यूटकडून पुढच्या महिन्यात केंद्र सरकारकडे ‘कोव्हिशिल्ड’च्या तातडीच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात येईल. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य सेवक आणि ज्येष्ठ नागरिकांना ही लस देण्याला प्राधान्य असेल. तर सामान्य जनतेसाठी मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून ही लस उपलब्ध होईल. ही लस साठवून ठेवण्यासाठी 2°C ते 8°C अंश सेल्सिअस तापमानाची गरज असेल. तर या लशीच्या एका डोसची किंमत 500 ते 600 रुपये असेल. केंद्र सरकार या लशीची मोठ्याप्रमाणावर खरेदी करणार आहे. त्यामुळे सरकारला ही लस 225 ते 300 रुपयांना मिळू शकेल. (The Covishield vaccine is 70 percent effective to prevent corona virus infection)

संबंधित बामत्या :

Good News! भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार

कोरोना लसीची चाचणी घेतलेल्या स्वयंसेवकाचा अनुभव, पहिल्या इंजेक्शनवेळी वेदना आणि तापाचा करावा लागला सामना!

कोरोनावरील लस बनवण्यासाठी 900 कोटींचं अतिरिक्त बजेट; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.