AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jahangirpuri Encrochment : हा बुलडोजर धर्म बघत नाही? दिल्लीतल्या अतिक्रमण हटाव मोहीमेत मंदीराचं अतिक्रमणही हटवलं

त्यानंतर यावरून वाद पेटविण्याचे काम काही समाजकंटकांनी सोशल मिडियावर केले. मात्र आता अशीच कारवाई मंदिरावर देखील करण्यात आली असून त्याचा ही अतिक्रमणात येणार भाग हा प्रशासनाने काढून टाकला आहे. त्यांमुळे मंदिर-मशीद वाद प्रशासनानेच थांबवला आहे.

Jahangirpuri Encrochment : हा बुलडोजर धर्म बघत नाही? दिल्लीतल्या अतिक्रमण हटाव मोहीमेत मंदीराचं अतिक्रमणही हटवलं
मंदिरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 7:28 PM

Jahangirpuri Encrochment : जहांगीरपुरीमध्ये (Jahangirpuri) हनुमान जयंतीला हिंसाचार (Violence) झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या अतिक्रमण प्रशासनाने बुलडोझरची कारवाई केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त घेण्यात आला होता. त्यादरम्यान जहांगीरपुरीमध्ये ज्या मशीदीसमोर हा वाद झाला होता. त्यावर प्रशासनाने कारवाई केली. या मशीद समोर गेटचे बांधकाम आणि त्याचा दरवाजा हा या कारवाईत काढून टाकण्यात आला. त्यामुळे देशातील मुस्लिम नेते यावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत. दरम्यान येथे असणाऱ्या मंदिराच्या (Temple) अतिक्रमणावर प्रशासनाची मेहरबानी का असा सवाल उपस्थित केला जात होता. तसेच हाच मुद्दा उपस्थित करत मंदिर-मशीद वाद पेटविण्याचे काम सुरू होते. आता मात्र प्रशासनाने ज्याप्रमाणे मशीदीच्या अतिक्रमणावर हातोडा चालविला त्याचप्रमाणे मंदिराच्या अतिक्रमीत भागावरही बुलडोजर चालवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे समाजमाध्यमातून मंदिर-मशीदीच्या भेदभावावर विचारण्यात येत असणारे प्रश्न वेगळे पडले आहेत.

जहांगीरपुरीमध्ये असलेल्या अतिक्रमणांवर प्रशासनाने बुलडोझरची कारवाई करण्याचा निर्धार केला होता. त्याप्रमाणे प्रशासनाने आज मोठ्या फौजफाड्यासह जहांगीरपुरीमध्ये आपला मोर्चा वळवला. तसेच तेथील कोणालाही नोटीस न देता थेट कारवाईसाठी बुलडोजर नेले. त्यानंतर येथील लोकांनी आपली घरे- दुकाने तोडू नये यासाठी विरोध केला. तोही पोलिसांच्या बळावर मोडून कोढण्यात आला. यादरम्यान या कारवाईत मशीद ही सोडण्यात आली नाही. येथील मशीदीसमोरील अतिक्रमीत भाग आणि त्याचे गेट तोडण्यात आले. यानंतर  वाद पेटण्याचे चित्र निर्माण झाले. कारण एकाच लाईनमध्ये मंदिर-मशीद असताना फक्त मशीदवर कारवाई का असा प्रश्न आता विचारला जात होता.

मंदिर-मशीद वाद

हनुमान जयंतीला ज्या जहांगीरपुरीमध्ये हिंसाचार झाला. तेथील अतिक्रमणांवर प्रशासनाने बुलडोझरची कारवाई केली. तसेच मशीदसमोरच्या गेटचा भाग हा पाडला. त्यानंतर यावरून वाद पेटविण्याचे काम काही समाजकंटकांनी सोशल मिडियावर केले. मात्र आता अशीच कारवाई मंदिराला लागून असलेल्या अतिक्रमीत भागही प्रशासनाने काढून टाकला आहे. त्यांमुळे मंदिर-मशीद वाद प्रशासनानेच थांबवला आहे.

हा बुलडोजर धर्म बघत नाही

जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंती ज्या मशीदीजवळ हिंसाचार झाला. त्या मशीदीवर प्रशासनाने अतिक्रमणाचे कारण सांगत कारवाईचा बडगा उगारला. मात्र याच मशीदी जवळ असणाऱ्या मंदिरावर मेहरबानी करण्यात आली. उलट तेथे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांची मोठी फौज उभारण्यात आली होती. ज्यामुळे मंदिराला छावणीचे स्वरूप आले होते. मंदिराचा बाहेरील भाग हा मशीदी एवढाच बाहेर आहे. तसेच त्याचे ही बाहेर शेड आहे. असं असताना हे प्रशासनाला का दिसत नाही. फक्त मशीदीचा विषय म्हणून हातोडा का मारला जात आहे, अशी विचारणा आता होत होती. त्यानंतर आता हा बुलडोजर धर्म बघत नाही. असेच काहीसे प्रशासनाने म्हटले आहे.

इतर बातम्या :

Jahangirpuri Encrochment : अतिक्रमण हटवताना दिल्लीतल्या जहांगिरपुरीत भेदाभेद? मशिदीसमोरच्या अतिक्रमणावरही बुलडोजर

Jahangirpuri Encrochment Drive : दिल्लीतल्या अतिक्रणविरोधी मोहिमेवर वाद, डाव्या नेत्या बृंदा करात मैदानात, सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीनंतरही कारवाई

Jahangirpuri Encrochment Drive : दिल्लीच्या बुलडोजर कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, स्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश, उद्या सविस्तर सुनावणी

भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका
भारताचा पाकड्यांना दणका, येत्या २३ मेपर्यंत बसणार मोठा आर्थिक फटका.
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
बीड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची प्रकृती खालावली.
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं..
लाडक्या बहिणींनो आता एप्रिलचा हफ्ता कधी? आदिती तटकरेंनी थेट सांगितलं...