NEET Exam 2023 : तपासणीच्या नावावर मुलींशी गैरव्यवहार, विचारले अश्लील प्रश्न
विवारी नीट परीक्षा देशभर घेण्यात आली. विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली. चेन्नई परीक्षा केंद्रात संतापजनक प्रकार समोर आला.
नवी दिल्ली : रविवारी नीट परीक्षा देशभर घेण्यात आली. विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली. चेन्नई परीक्षा केंद्रात संतापजनक प्रकार समोर आला. तपासणीदरम्यान महिला उमेदवारांना अंतर्वस्त्र उतरवण्यास सांगण्यात आले. चेन्नई परीक्षा केंद्रावर स्थानिक पत्रकाराने ट्वीट करत ही माहिती दिली. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, पत्रकाराने सांगितलं की त्यांनी एका मुलीला कोपऱ्यात बसलेलं पाहिलं.
मुलीला विचारल्यानंतर केंद्रावर गैरव्यवहार केल्याचं सांगण्यात आलं. विद्यार्थिनीने सांगितले की, परीक्षेवेळी तिला अंतर्वस्त्र वापरायचे नाही, असे सांगण्यात आलं. त्यामुळे ती कोपऱ्यात बसली होती.
अंतर्वस्त्र उतरवण्यास सांगण्यात आलं
पत्रकाराला ट्रोल्स केल्यानंतर त्याने ट्वीट डिलीट केलं. त्याने दिलेल्या माहितीनुसार, अर्ध्या मुली अंतर्वस्त्र न वापरता परीक्षा केंद्रावर आल्या होत्या. मला अश्लील प्रश्न विचारणाऱ्यांनी परीक्षा बोर्डाला प्रश्न विचारावे की, अंतर्वस्त्र वापरण्यास परवानगी होती की नव्हती.
सोशल मीडियावर कमेंट्स
या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ज्या केंद्रावर हा प्रकार घडला. त्या केंद्राच्या विरोधात कमेंट्स सोशल मीडियावर होत आहे.
तो पत्रकार ट्रोल्स
परीक्षा केंद्रावर असा प्रकार घडल्याचे म्हटल्यामुळे सोशल मीडियावर तो ट्रोल्स झाला. त्यामुळे त्याने पोस्ट डिलीट केली. पण, खरचं अशी घटना घडली असेल, तर हा संतापजनक प्रकार आहे.
मणीपूरमधील परीक्षा स्थगित
दुसरीकडे, मणीपूरमध्ये आरक्षणावरून हिंसाचार झाला. त्यामुळे मणीपूरमधील नीट परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या विनंतीनंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हा निर्णय घेतला. मणीपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन यांनी एनटीएला पत्र लिहीलं होतं.