घातपाताचा मोठा कट उधळला! दिल्लीत बॅगमध्ये आढळलेल्या आयईडी बॉम्बचा खरा सूत्रधार कोण?
एका बॅगमध्ये साधारण तीन किलो वजनाचा आयईडी बॉम्ब ठेवला होता अशी माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आलीय. वेळीच हा बॉम्ब डिफ्यूज करण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीच्या फूल मार्केटमध्ये आयईडी बॉम्ब (IED bomb) सापडल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी पूर्व दिल्लीतील (New delhi bomb) एका फ्लॉवर मार्केटच्या मध्यभागी ठेवलेल्या एका पिशवीत मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली. त्यामुळे ही स्फोटके येथे कुणी ठेवली? हा घातपाताचा कट कुणाचा होता? दिल्ली पुन्हा टार्गेटवर आहे का? असे एक ना अनेक सवाल उपस्थित झाले आहेत. एका स्कूटीवर ही बॅग ठेवण्यात आली होती. याबाबत संशय आल्याने स्थानिक दुकानदाराने पोलिसांना खबर दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मार्केटमध्ये तातडीने धाव घेतली होती. त्यानंतर अंदाज घेऊन गाझीपूर मार्केटमध्ये पोलिसांनी नियंत्रित स्फोट घडवून आणला. दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या सीमेजवळ असलेल्या बाजारपेठेत हा नियंत्रित स्फोट घडवून आणण्यासाठी पोलिसांनी आठ फूट खड्डा खोदला. स्फोटानंतर काही काळ धुराचे लोटही दिसून आले.
The weight of recovered IED recovered from Ghazipur was approximately 3 kg. NSG received information from Delhi Police around 11 am and the explosive was defused around 1.30 pm: NSG
Visuals of forensic team from the spot. pic.twitter.com/VBWvWVa15u
— ANI (@ANI) January 14, 2022
तीन किलो वजनाचा आयईडी बॉम्ब
एका बॅगमध्ये साधारण तीन किलो वजनाचा आयईडी बॉम्ब ठेवला होता अशी माहिती दिल्ली पोलिसांकडून देण्यात आलीय. वेळीच हा बॉम्ब डिफ्यूज करण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. इथे हा बॉम्ब कुणी ठेवला? याचा पोलीस तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आयईडी बॉम्ब प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बॉम्बला टायमरही लावण्यात आला होता
मार्केटमध्ये सापडेला बॉम्ब असचा ठेवला नसून त्याला त्याला टायमरही लावण्यात आला होता, त्यामुळे जास्त धोका होता. पोलिसांनी प्राथमिक पाहणी केल्यानंतर बॉम्ब नाशक पथक इथे बोलवण्यात आले, तसेच अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. पिशवी टाकून एक माणूस सकाळी 9.30 च्या सुमारास स्कूटीवरून बाजारात गेला, काही वेळाने ही पिशवी तिथेच घटनास्थळी पडलेली दिसली, त्यानंतर फूल विक्रेत्याला काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने पोलिसांना बोलावले. आता कट उधळल्याने मोठा अनर्थ टळला आहे, मात्र दिल्ली पुन्हा टार्गेटवर आली आहे का? या कटामागे कुठल्या दहशतवादी संघटनेचा हात आहे का? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहे. पोलिसांच्या तपासात पुढे काय महिती समोर येतेय हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.